Video : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणात अंधारेंनी समोर आणला महत्त्वाचा पॉईंट; पुरावाही दाखवला

Phaltan Dr. Death Case पीडितेच्या हातावर निरिक्षक शब्द लिहिलाय. त्याला पहिली विलांटी आहे आणि मुलीच्या पत्रात दुसरी विलांटी आहे.

  • Written By: Published:
Video : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणात अंधारेंनी समोर आणला महत्त्वाचा पॉईंट; पुरावाही दाखवला

UBT Leader Sushma Andhare On Phaltan Dr. Death Case : फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर मृत्यू प्रकरणामुळे एकीकडे राज्यातील वातावरण ढवळून निघालेलं असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज (दि.29) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील महत्त्वाचा पॉईंट समोर आणत त्याचे पुरावेदेखील दाखवले आहेत.

Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना..; फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री

हातावरील शब्दांत पहिली वेलांटी तर, पत्रात दुसरी

फलटण येथील मृत्यूप्रकरणात डॉक्टर युवतीच्या हातावरील आणि तिने लिहिलेल्या तक्रार पत्रातील हस्ताक्षर अजिबातच जुळत नसल्याचे सांगत हातावरील निरीक्षक हा शब्द आणि तक्रार अर्जातील तोच शब्द यामध्ये तफावत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संबंधित डॉक्टरच्या हातावरील शब्द आणि चारपानी पत्राचे झूम केलेल्या पत्रातील निरीक्षक शब्दांचे फोटोदेखील दाखवले. पीडितेच्या हातावर निरिक्षक शब्द लिहिलाय. त्याला पहिली वेलांटी आहे आणि मुलीच्या पत्रात दुसरी वेलांटी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच संबंधित डॉक्टरने लिहिलेल्या चार पानी पत्रात तब्बल 9 वेळा निरीक्षक असं लिहिलं आहे, असा महत्त्वाचा मुद्दादेखील सुषमा अंधारे यावेळी मांडला.

बिद्रे हत्याकांडात Y अन् U शब्दांनी गूढ उकलले

नवी मुंबईची पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचं उदाहरण देत Y आणि U च्या आधारावर संबंधिक प्रकरणाचा उलगडा झाला होता, असं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या की, बिद्रे हत्याकांड प्रकरणात Y आणि U अशा दोन शब्दांनी प्रकरणाचे गूढ उलगडले होते. आता फलटण डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाचा गुंता निरीक्षक शब्द सोडविणार का? याकडे अंधारेंनी लक्ष वेधले. Sushma Andhare On Phaltan Dr. Death Case

मुलीचा सीडीआर लीड कराचा अधिकार कुणी दिला?

महिला आयोगाच्या पत्रकार परिषदेत चाकणकर यातील नेते किंवा डॉक्टर धुमाळ, पोलीस अधिकारी यांच्या सीडीआरबद्दल बोलल्या नाही. पण त्या पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या. त्या मुलीचा मोबाईल किंवा सीडीआर लीक करायचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? महिला आयोग कोणत्या अधिकारावर त्याबाबत बोलणी केली असा सवालही यावेळी अंधारेंनी उपस्थित केला.

डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शवविच्छेदनाचा अहवाल आला, त्या रात्री काय घडलं

चाकणकरांना पदावर ठेवायचा विचार करावा

राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखादी व्यक्ती पीडितेची बदनामी करत असेल तर, अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रक्रिया करावी”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

फडणवीसांचा चौकशी सोडून बाजू मांडण्याचा प्रयत्न 

आरोपींची चौकशी करायची सोडून त्यांना क्लिनचिट देण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी महिला आयोग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न केल्याची टीकाही अंधारे यांनी केली.त्यामुळे फलटणच्या डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या हातावरील निरीक्षक हा शब्द आणि तक्रार अर्जातील तोच शब्द यामध्ये तफावत असल्याचा दावा करून तो शब्द मग लिहिला कुणी? तरुणीच्या हातावर सुसाईड नोट कुणी लिहिली? असे प्रश्न उपस्थित करून हत्या की आत्महत्या असा संशय अंधारे यांनी उपस्थित केला.

Video : मी दाव्यांना घाबरत नाही! काय करायचं ते करा, अंधारेंचे निंबाळकरांवर पुन्हा गंभीर आरोप

येथे क्लीन चीट वाटून मिळतील

‘मुख्यमंत्री हे या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण त्यांनी न्यायाधीशाच्या खुडच्यावर बसू नये. हा त्यांचा जॉब नाही. तुमचा कार्यालयाचा बाहेर बोर्ड लावावा की येथे क्लीन चीट वाटून मिळतील. आमचा गावात 34 रणतित निंबाळकर आहेत असं त्यांनी 34 निंबाळकर तिथे आहेत तर ते 33 कोण आहेत याचा शोध घ्यावा.

follow us