डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शवविच्छेदनाचा अहवाल आला, ‘त्या’ रात्री काय घडलं

साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या प्रकणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला.

  • Written By: Published:
News Photo (90)

फलटण येथील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. (Phaltan) या डॉक्टर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनाच्या अहवालात नेमकी कोणती माहिती समोर येणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, आता हा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला आहे. विशेष बाब म्हणजे या डॉक्टर महिलेच्या शरीरावर अन्यत्र कुठेही जखमा नाहीत, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दुसरीकडे पीएसआय बदने, पोलीस कर्मचारी बनकर तसंच मृत डॉक्टर यांचे सीडीआर पोलिसांच्या हाती आले आहेत. याच सीडीआरचा आता तपास केला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून मृत डॉक्टरचे बदने तसंच बनकर या दोघांसोबतही फोन कॉल झालेले आहेत. त्यामुळे डॉक्टर महिलेचे दोघांशी नेमके कोणत्या विषयावर बोलणे व्हायचे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सध्यातरी बदनेने पोलिसांना त्याचा फोन दिलेला नाही. बदनेच्या फोनचा तपास सुरू आहे.

माझे डॉक्टर महिलेसोबत मैत्रीशिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नसल्याचे बदने पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचे गूढ जास्तच वाढले आहे.महिला डॉक्टर प्रकरणी दरम्यान, सातारा घटनेचे राजकीय पडसदाही उमटत आहेत. या प्रकरणाचा भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी लावला जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा निंबाळकरांशी कोणताही संबंध नाही, असे सांगत त्यांना क्लीनचीट दिलेली आहे.

तर दुसरीकडे डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा खून करण्यात आलाय, याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी भविष्यात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us