Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना… फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री

MLA Suresh Dhas On Phaltan Women Doctor Suicide Case जर तिला कोणी बीडची म्हणून हिणवत असेल तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.

  • Written By: Published:
Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना... फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री

MLA Suresh Dhas On Phaltan Women Doctor Suicide Case : फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता भाजप आमदार सुरेश धसांची एन्ट्री झाली आहे.  या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे, अशी मागणी धसांनी केली आहे. सुसाईड नोट मध्ये हातावरती लिहिलेले जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत. या घटनेत जे कोणी खासदार त्यांचे पीए असतील तेसुद्धा यात आरोपी झाले पाहिजे तसेच यात जे आरोपी आहेत त्या सर्वांना फासावर लटकवले पाहिजे, असे माझे मत आहे.

आम्ही बीडचे लोक कबाड कष्ट करून…

फलटण प्रकरणावर बोलताना धस म्हणाले की, पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेकीबाळीला शिकवतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर, कारवाई केली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे आम्ही बीडचे लोकं पोटाला चिमटा घेऊन काबाडकष्ट करून, ऊस तोडून लेकरं उच्चशिक्षित करत आहोत. बीडची म्हणून कोणी हिणवत असेल तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आमचे बीडचे लोक बुद्धिमान आहेत आणि सर्व क्षेत्रात पुढे असल्याचे धस म्हणाले.

तीन एकर जमीनीवर लेकीला बनवले होते डॉक्टर

आई-वडिलांनी केवळ तीन एकर जमीनीवर लेकीला डॉक्टर बनवले होते. त्यामुळे तिच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिलेले जे कोणी पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यानंतर तो बनकर हे तर, आरोपी झालेच पाहिजेत. परंतु, संबंधित महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील हे सर्व यामध्ये आरोपी झाले पाहिजेत. तसेच या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी खासदार त्यांचे पीए असतील ते सुद्धा यात आरोपी झाले पाहिजेत. त्या लेकरावरती अत्याचार होत असताना तिने तक्रार दिली होती, तिची दखल न घेणारे जे जे कोणी असतील ते या प्रकरणी दोषी असून, सगळ्या आरोपींना फासावर लटकले पाहिजे, असे माझे मत आहे.

 

follow us