Phaltan Case : मृत डॉक्टर तरुणीने ज्यांच्याकडे तक्रार केली होती ते डॉ. धुमाळ काय म्हणाले?

डॉक्टर महिलेवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यासाठी त्यांचे पीए बहिणीच्या भेटीला आले होते. त्यांच्याकडून दबाव टाकला जात होता.

  • Written By: Published:
Phaltan Doctor Case : मृत डॉक्टर तरुणीने ज्यांच्याकडे तक्रार केली होती ते डॉ. धुमाळ काय म्हणाले?

Dr. Anshuman Dhumal On Phaltan Women Doctor Suicide Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या (Phaltan Women Doctor Suicide Case) आत्महत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तर, दुसरीकडे मृत महिला डॉक्टरच्या आते भावाने खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये खासदाराचे पीए तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी खासदारांना फोन लावून दिला असता त्यांनी देखील तिच्याशी बोलणे केले होते असा आरोप केला आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकरणात मृत महिला डॉक्टरने होणाऱ्या त्रासाबद्दल रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचेही तरुणीने सुसाईड नोटमध्ये नमुद केले आहे. मात्र, याबाबत मला काहीच माहिती नाही असे सांगत सर्व प्रकरणातून हात वर केले आहे. एबीपी माझाशी बोलताना धुमाळ यांनी सर्व दावे फेटाळले आहेत.

ती बीडची म्हणून जर… सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे संतापले

छळ होतोय, असे कुठेही लेखी स्वरुपात कळवले नव्हते

पीडित संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. मात्र, पोलीस कर्मचारी तिला त्रास देत असल्याचे जे आरोप केले आहेत, तसा कुठलाही उल्लेख आमच्या कार्यालयाकडे नाही. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशी समितीसमोर तसा खुलासा केला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. डॉक्टर तरुणीने माझा छळ होतोय, असे कुठेही लेखी स्वरुपात कळवले नव्हते. त्यांनी केवळ चौकशी समितीसमोर पोलिसांबाबत काही मुद्दे मांडले. चौकशी समितीचा अहवाला आला त्यानुसार सूचना देण्यात आल्या होत्या. हे प्रकरण तिथेच संपले होते, असेही डॉ. धुमाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सातारा हादरलं! PI कडून अत्याचार, हातावर सुसाईड नोट अन् डॉक्टरची आत्महत्या; फडणवीसांची थेट कारवाई

खासदारांच्या प्रश्नावर बोलू शकत नाही

डॉक्टर महिलेवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यासाठी त्यांचे पीए बहिणीच्या भेटीला आले होते. त्यांच्याकडून दबाव टाकला जात होता. त्यांनी खासदारांना फोन लावून तिच्याशी बोलणं देखील करून दिलं होतं. हे खासदार फलटण भागातील आहेत मात्र, खासदार कोण हे माहिती नाही. याबाबत बहिणीने या प्रकरणी 2-3 महिन्यांपूर्वीच तक्रार दिली होती. वरिष्ठांनादेखील याबाबत माहिती देत आपल्यावर जीवन संपवण्याची वेळ येऊ शकते. असं सांगितलं होतं, पण त्याची दखल घेतली गेली नाही. असा खळबळजनक आरोप या मृत महिला डॉक्टरच्या भावाने केला आहे. याबाबत धुमाळ यांना विचारले असता त्यांनी मला मृत डॉक्टर तरुणीने खासदारांबाबत कधीही काही सांगितले नाही. त्यामुळे मी यावर काहीच भाष्य करु इच्छित नसल्याचे सांगितले. पीएसआय गोपाळ बदने याचं नाव मी प्रथमच ऐकत आहे. मला किंवा कर्मचाऱ्यांनी चौकशी समितीसमोर जो जबाब दिला आहे, त्यामध्ये असा कोणताही प्रकार जाणवल्याचे म्हटलेले नाही.

follow us