सातारा हादरलं! PI कडून अत्याचार, हातावर सुसाईड नोट अन् डॉक्टरची आत्महत्या; फडणवीसांची थेट कारवाई

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे.

  • Written By: Published:
सातारा हादरलं! PI कडून चारवेळा अत्याचार, हातावर सुसाईड नोट अन् डॉक्टरची आत्महत्या

Phaltan Sub District Hospital Doctor Suicide Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळन आले असून, आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या हातावार सुसाईड करण्याचे कारण नमुद करण्यात आले आहे. यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

Pune News : पतीच्या डोक्यात संशयाचं भूत; पत्नीने ऐन दिवाळीतच काढला काटा…

हातावरील सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

गुरूवारी (दि.23) रात्री आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. महिलेने त्यांच्या हातावर आत्महत्या करण्याचे कारण तळहातावर लिहिले होते. ज्यात त्यांनी  पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिल्याचे नमुद केले आहे. महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन ‘माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

‘अब की बार मोदी सरकार’ चा नारा देणारे जाहिरात जगतातील जादूगार पियुष पांडे यांचे निधन

संबंधित डॉक्टरची सुरू होती चौकशी

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीनंतर संबंधित महिला डॉक्टरची अंतर्गत चौकशी सुरू होती. यामुळे महिला डॉक्टर मनासिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊलं उचलल्याचे आता बोलले जात आहे.

माझ्यावर अन्याय…मी आत्महत्या करेल

या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.

follow us