खरं सांगा दादा–भाऊ नक्की कुणी कुणाचा केलाय गेम?; ठाकरेंच्या ‘वाघिणीनं’ बरोबर मुद्दा उचलला!

Sushma Andhare X Post On Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाच्या रूपात कमबॅक झाले आहे. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर काल (दि.23) भुजबळांना धनंजय मुंडेंकडून काढून घेण्यात आलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभाव सोपण्यात आला असून, मुंबईतील ‘सातपुडा’ बंगलादेखील भुजबळांना देण्यात आला आहे. पण, या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) कवितेच्या माध्यमातून अजितदादा आणि फडणवीसांकडे बोट दाखवत खरं सांगा दादा-भाऊ नक्की कुणी कुणाचा केलाय गेम? असा प्रश्न विचारला आहे. अंधारेंच्या या पोस्टचे अनेक अर्थ निघत असून, खरचं मुंडेंचा पत्ता कट करून आणि भुजबळांना पुन्हा सत्तेत आणून त्यांचाही गेम झालाय का? की, एकाला बाहेर काढून अन् दुसऱ्याला मागच्या दाराने आता घेऊन दादा आणि फडणवीसांनीचं एकमेकांचा गेम केलाय? याची चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.
पाहिले युतीच्या बाता अन् आता हात आखडता; एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांचे घूमजाव
अंधारेंची पोस्ट नेमकी काय?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अंधारेंनी टाकलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, कशाला देता उगाच दुसऱ्यांना ब्लेम जिथे भल्या भल्यांचे चुकतात नेम तिथे कधीही होईल तुमचा गेम लाल दिव्यानंतर बंगला हे मंत्र्यांचे असणारच aim भुजबळ काय मुंडे काय सातपुड्यासाठी सगळेच सेम खरं सांगा दादा –भाऊ नक्की कुणी कुणाचा केलाय गेम? #खेळ_खुर्चीच असा प्रश्नही अंधारेंनी उपस्थित केला आहे.
कशाला देता उगाच
दुसऱ्यांना ब्लेमजिथे भल्या भल्यांचे चुकतात नेम
तिथे कधीही होईल तुमचा गेमलाल दिव्यानंतर बंगला
हे मंत्र्यांचे असणारच aimभुजबळ काय मुंडे काय
सातपुड्यासाठी सगळेच सेमखरं सांगा दादा –भाऊ
नक्की कुणी कुणाचा केलाय गेम?#खेळ_खुर्चीचा pic.twitter.com/vd4nWHYAcu— SushmaTai Andhare (@andharesushama) May 24, 2025
संतोष देशमुख प्रकरण कराड अन् मुंडेंचा झाला गेम
काही महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली. या हत्येमागे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचे बोलले जात असून, सध्या कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्यानंतर महायुती आणि फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कार्यक्षमतेवर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर अखेर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी का होईना पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. मात्र, राजीनामा देण्यामागे प्रकृतीचे कारण मुंडेंकडून देण्यात आले. एकूणच काय तर, देशमुखांची हत्या आणि कराड मुंडे यांचे संबंध यामुळे भाजपची प्रतिमा खराब होत होती. त्यामुळे भाजपकडून मुंडे आणि कराड यांच्यातील संबंध मतदारांसमोर आणण्याची मोठी जबाबदारी सुरेश धस यांच्याकडे होती. वेळोवेळी त्यांनी यातील अनेक गोष्टी समोर आणल्या. त्यामुळे भाजपला धोकादायक ठरणाऱ्या मुंडेंचा गेम भाजपनं मुंडेंच्या मतदार संघातील नेत्याने केल्याचे आजही बोलेले जाते.
भुजबळ राज्याच्या राजकारणातील ट्रम्प कार्ड?, मंत्री बनल्याने पवारांसह फडणवीसांना मिळणार ५ फायदे
भुजबळांना पहिले नकार अन् आता ग्रँड कमबॅक
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार अस्तित्त्वात आले. मात्र, यावेळी मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदेंऐवजी फडणवीसांच्या गळ्यात पडली. त्यानंतर दीर्घप्रतिक्षेनंतर फडणवीस सरकारचा विस्तार करण्यात आला. मात्र, विस्तार करण्यात आलेल्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे भुजबळांनी ‘जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना’ असे सांगत बंडाचे संकेत दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातील धाकधीक वाढली होती.
जहाँ नहीं चैना ते कॅबिनेट; भुजबळांच्या कमबॅकचं ‘हिडन सिक्रेट’; समीकरण अन् राजकारण नेमकं कसं?
पुढील चार महिन्यात निवडणुका
कराड-मुंडे यांच्या संबंधांमुळे एकीकडे भाजप आणि महायुती सरकारची मतदारांमध्ये मलिन होणारी प्रतिमा सांभळण्यासाठी अखेर मुंडेंना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुढीलचार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश फडणवीस सरकारला दिले. या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार आणि फडणवीसांना काळजी होती ती नाराज भुजबळांची. या दोन्ही नेत्यांना आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भुजबळांना अधिककाळ मंत्रिमंडळातून बाहेर ठेवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या भुजबळांचे ओबीसी मतांसाठी तर मंत्रिमंडळात कमबॅक करण्यात आले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असून, या सर्व खेळात महायुतीसाठी डोकेदुखी ठरलेल्या मुंडेंचा आणि मतांसाठी भुजबळांचा की, एकाला बाहेर काढून अन् दुसऱ्याला मागच्या दाराने आता घेऊन दादा आणि फडणवीसांनीचं एकमेकांचा गेम केलाय? याची चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.