“दलाल मित्रांनी डाव साधला, धनंजय मुंडेंना उद्धवस्त केलं, मी त्यांना..”, करुणा मुंडेंचा धक्कादायक खुलासा

“दलाल मित्रांनी डाव साधला, धनंजय मुंडेंना उद्धवस्त केलं, मी त्यांना..”, करुणा मुंडेंचा धक्कादायक खुलासा

Karuna Munde Exclusive Interview With Letsupp Marathi : धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत. ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते. आज या लोकांकडे अडीच-अडीच हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. पण आज मी ज्या घरात राहत आहे त्या घरावर कर्ज आहे. या कर्जाचे हप्ते सुद्धा भरले जात नाहीत. माझ्या मुलाच्या नावावर एकही गाडी नाही. धनंजय मुंडेंना वाईट गोष्टींचं व्यसन लावून हे दलाल लोक मोठे झाले. आज धनंजय मुंडेंचं भवितव्य पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. मला ज्याची भीती वाटत होती ते आज झालं आहे.’ अशा शब्दांत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंबद्दलच्या इतिहासातल्या गोष्टी समोर आणल्या. लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

दलाल लोकांनी मुंडेंना उद्धवस्त केलं

’29 डिसेंबर 1996 पहिल्यांदा आमची भेट झाली त्यादिवसापासून 2021 पर्यंत खूप आमच्यात खूप वादविवाद झाले. त्यांची फॅमिली माझी फॅमिली आणि आम्ही दोघांमध्ये खूप वाद झाले. अगोदर पण तीन वेळा त्यांनी मला सोडून दिलं होतं. तरीपण ते स्वतः आले. मी गेले नाही आणि त्यावेळी तो मी वाद काय केला नाही. मी शांत होते. पुढे धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर असे खूप काही लोक आमच्या घरामध्ये येत होते त्यांचे मित्र म्हणून मित्र कशाचे ते तर दलाल होते. राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे या लोकांनी माझ्या नवऱ्याला वाईट सवय लावली. या गोष्टींचा मला अंदाज होता. मी त्यांना सावध सुद्धा करत होते.’

‘पण, धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत. ते आमच्या घरात थेट स्लीपर चप्पल घालून येत होते. नंतर या लोकांनी फक्त पैशांसाठी. आज या लोकांकडे अडीच अडीच हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. पण आज मी ज्या घरात राहत आहे त्या घरावर कर्ज आहे या कर्जाचे हप्ते सुद्धा भरले जात नाहीत. माझ्या मुलाच्या नावावर एक गाडी सुद्धा नाही. धनंजय मुंडेना वाईट गोष्टींचं व्यसन लावून हे दलाल लोक मोठे झाले. आज धनंजय मुंडेंचं भवितव्य पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. मला ज्याची भीती वाटत होती ते आज झालं आहे.’

Video : पंकजांविरोधात मला सुपारी देण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं नवीन कांड बाहेर काढत दमानियांचे गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. तु्म्ही सुद्धा कौटुंबिक वादातून त्यांच्यावर दावा दाखल केला आहे. न्यायालयात जे युक्तीवाद झालेत त्यात त्यांनी म्हटलंय की मुलं स्वीकारण्यास तयार आहे पण पत्नी मानण्यास तयार नाही नेमकं हे प्रकरण काय असे विचारले असता ‘धनंजय मुंडे यांची आमदारकी पण लवकरच जाणार आहे. आमदारकी जाऊ नये यासाठी कौटुंबिक न्यायालयात माझ्यावर असे आरोप केलेले आहे की मी त्यांची पत्नी नाही पण मुलंबाळं माझे आहेत, असं होऊ शकत नाही. 1998 पासून आम्ही दोघे सोबत होतो आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सोबत होतो. आम्हाला मुले सुद्धा झाली. 27 वर्ष कोणी कोणासोबत लिव्हिंग रिलेशन मध्ये राहू शकता का? लग्न न करता कुणी राहू शकतं का?’ असे सवाल करुणा मुंडे यांनी (Karuna Munde) उपस्थित केले.

‘आमचं लग्न झालं आहे. याचे पुरावे आजही माझ्याकडे आहेत. मी त्यांची पहिली पत्नी आहे. ज्यावेळी आमच्यात वाद झाले तेव्हा मी सर्व पुरावे घेऊन परळीत गेले होते. त्यावेळी माझ्या वाहनात रिव्हॉल्व्हर टाकण्यात आली. माझ्याकडील सगळे पुरावे पोलिसांनी हिसकावून घेतले. आता पण ते माझे यूएसबी सगळं जे आहे ते परळी पोलीस स्टेशनमध्ये आहे तिकडे पण मी निवेदन दिलेले आहे.’

पहिल्या भेटीत कार्ड मिळालं त्यात..

तुम्ही 27 वर्ष एकत्र असल्याचा आता दावा करताय अशा काय आठवणी आहेत असे विचारले असता मुंडे म्हणाल्या, ‘आमची प्रेमकहाणी खूप फिल्मी आहे. पहिल्या भेटीत त्यांनी मला एक कार्ड दिलं होतं. जर तुला तुझं नशीब घडवायचं असेल तर या नंबरवर कॉल कर असं त्या कार्डमध्ये लिहिलेलं होतं. एका आश्रमात आमची भेट झाली होती. त्यांनी मला पहिल्या भेटीत एक कार्ड दिलं होतं.’

‘या कार्डवर त्यांचाच मोबाइल नंबर होता. पहिल्या नजरेतच त्यांचं माझ्यावर प्रेम जडलं होतं. पुढे धनंजय मुंडे यांनी माझ्या घरच्यांची भेट घेत मला पम्मा (त्यावेळी मला पम्मा म्हणत होते) बरोबर लग्न करायचं आहे. तु्म्ही दुसऱ्या कोणत्याच मुलाचा विचार करू नका असे त्यांनी माझ्या घरच्यांना सांगितले होते. धनंजय मुंडे घरातून गेल्यानंतर आईने मला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तो मुलगा तुझ्यासाठी चांगला नाही. परंतु, लहानपणापासूनच माझा स्वभाव ज्या गोष्टीला विरोध झाला तीच गोष्ट करायची असा होता. त्यानुसार पुढे गोष्टी घडत गेल्या. धनंजय मुंडे यांच्या घरातील सगळ्यांनाच अगदी पहिल्या दिवसापासूनच माहिती होतं.’

धनंजय मुंडेंनी पहिलं लग्न लपवलं

‘आमच्या दोघांच्या जे वाद झाले आहेत ते खरंतर 2021 पासून सुरू झाले. त्यांचं दुसरं लग्न तर 2002 मध्येच झालं होतं. मला ही गोष्ट माहीत नव्हती. ज्यावेळी माहित झालं त्यावेळी खूप उशीर झालेला होता. तरीही आम्ही दोघींनी ठरवलं की आपल्याला नवऱ्याला संभाळायचे. राजकारण म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं असतं याची जाणीव मलाही होती. मी त्यांच्याबरोबर जगभरात फिरुन आले आहे. त्यांचे जितके व्हिजा आहेत ते माझ्याबरोबरचे आहेत. ते त्यांच्या पहिल्या पत्नीलाही (राजश्री मुंडे) सोबत घेऊन जाऊ शकत होते परंतु त्यांनी तसं कधीच केलं नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube