Karuna Munde यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप तर परिणाम भोगावे लागतील म्हणत भाजपला इशारा
Karuna Munde : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी, मी बीड सोडावं म्हणून 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा धनंजय मुंडे तिथे होते. तसेच अशा महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नसलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं? असा गंभीर आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी केलेल्या युतीवरही सवाल केला. करूणा मुंडे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मी करुणा धनंजय मुंडे, ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे. भाजप महिलांसाठी अनेक योजना आणते. मोदी साहेबांचं नाव कोणालाही निवडून आण्यासाठी पुरेसं आहे. मग असं असताना पंतप्रधानांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केलेल्या अजित पवारांना भाजपने सत्तेत का घेतलं आहे?
मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’
ईडी चौकशी झालेले हसन मुश्रीफ, जो आधीच गुंड आहे ते धनंजय मुंडे या लोकांना सोबत घेऊन मंत्रिपद दिलं. तुम्ही काय सिद्ध करू पाहताय? चोराच्या हातात तुम्ही चाव्या देत आहात. ज्यांना तुम्ही तुरूंगात पाठवायला हवं होतं. त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात बसवलं. धनंजय मुंडेंनी आधी तर 2 लग्न केली, 5 मुलं असणं हा सुद्धा गुन्हा आहे. हा व्यक्ती संवैधनिक पदावर बसू शक्त नाही.
‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख, आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही’; अजितदादांचा संताप
त्याचबरोबर या व्यक्तीने मी बीड सोडावं म्हणून 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा धनंजय मुंडे तिथे होते. मी तिथून निवडणूक लढवू नये म्हणून मला मारहाण झाली. मी तर अजून तसं सांगितलं ही नाहीये की लढेन किंवा नाही. मी ज्यावेळी तक्रार देण्यासाठी परळी पोलीस स्थानकात गेली. तेव्हा पोलिसांनी सुद्धा मला मारहाण केली. दरवेळी तक्रार देते पण, आजवर कोणीही यावर काही कारवाई करत नाही… एकदा ही fir झाली नाही.
Ram Mandir : उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले, ‘मशिद पाडून मंदिर….’
त्यामुळे भाजप सारख्या पक्षाला, देवेंद्रजी तुमच्या सारख्या नेत्याला असं राजकारण करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला यासाठी कधीच माफ करणार नाही. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत तुम्हाला या फटका सहन करावं लागेल. तसेच इथे महिन्याभरात न्याय मिळाला नाही. तर मी मोदीजींना निवेदन देऊन लोकसभेच्या समोर उपोषण करेन. मला उद्या काही झालं तर हे मला हॉस्पिटलमध्ये नेऊन विष देऊन मारून टाकतील. असे गंभार आरोप यावेळी करूणा मुंडे यांनी केले.
तसेच त्या म्हणाल्या की, मी मदत मागण्यासाठी सुप्रिया ताई, शरद पवार यांच्याकडे गेली आहे. उद्धव साहेबही भेटले नाहीत. राज ठाकरे तुमच्यात इतकी ताकद आहे की, तुम्ही टोल बंद करू शकता. तर महिलांसाठी का नाही? कोणालाच वेळ नाही. त्यामुळे आता शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई काय करत आहेत? ते पाहायचं आहे.