भाजपकडून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट; कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथलांचे टीकास्त्र

  • Written By: Published:
भाजपकडून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट; कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथलांचे टीकास्त्र

Ramesh Chennithala on BJP :  येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राममंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यद तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे राममंदिर मुद्यावरून राजकारण तापतांना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाकडून अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाचे भांडवल केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठी केले जात आहे. मंदिर अजून अर्धवट असून अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे, हे शंकराचार्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. परंतु भाजपाला घाई झाली असून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केला.

मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’ 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात अमरावतीतून झाली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणारे मुर्ख, आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही’; अजितदादांचा संताप 

यावेळी रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या विरोधात नाही, सर्वांना आपले धार्मिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेतेही अयोध्येला जाऊन आले आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेस नेते व उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सहकाऱ्यांसह अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. अयोध्येला ज्यांना जायचे आहे त्याला विरोध केलेला नाही. भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी हे राजकीय फायद्यासाठी मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट करत आहेत, ते चुकीचे आहे आणि जनतेला ते माहीत आहे.

भारत जोडो न्याय यात्रेविषयी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून या न्याय यात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही निवडणूक यात्रा नाही, तर देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहेत, ही यात्रा देशासाठी आहे.

कोणीही पक्ष सोडून जाणार नाही
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून सर्व नेते एकत्र आहेत कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. भारतीय जनता पक्ष अफवा पसरवून दिशाभूल करत आहे, असं ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube