मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’
Ajit Pawar On Nana Patole : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) व्यक्तिगतपणे टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) सडकून टीका करीत असतात. त्यावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अजित पवार यांना खोचक सल्ला दिला होता. जसं तुम्ही शरद पवारांचं वय विचारता तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वय का विचारत नाही? असा सवाल केला होता. त्यावर बोलताना अजित पवार नाना पटोले यांच्यावर चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळालं आहे. मुंबईतून अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांना चांगलच खडसावून बोलले आहेत.
मिलिंद देवरा, पार्थ पवार, विनोद तावडे ‘राज्यसभेच्या’ शर्यतीत… राणेंना ‘नारळ’ मिळणार?
अजित पवार म्हणाले, आपल्या सर्वांचंच वय होणार आहे. ज्यावेळी वय 80 पेक्षा पुढे जाईल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना वय विचारु, असं मिश्लिल अंदाजात अजितदादा म्हणाले आहेत. तसेच नाना पटोले यांनी आमच्यात नाक खुपसण्याचं कारणच नाही, आम्ही आमचं बघू, नानाला म्हणावं तुम्ही किती पार्ट्या फिरुन आला आहात, हे आम्हाला माहित असल्याचा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
फडणवीसांनी नेते घडवले नाही तर चोरले; अंधारेंनी पक्षफोडी ते इमेज सगळंच काढलं
काय म्हणाले होते नाना पटोले?
काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांना भाजपात घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. वयोमानाच्या मर्यादा भाजपने इतरांसाठी लावलेल्या आहेत पण अद्याप त्यांनी स्वत;च पद सोडलेलं नाही. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त व्हा असं बोलून दाखवावं, मग बघा त्यांचा कसा 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर येतो, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली होती.
यावेळी अजित पवार यांनी व्हायरल व्हिडिओवरुनही थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आज जे कुणी तो व्हिडिओ व्हायरल करत आहेत, क्लिप फिरवत आहेत मला त्यांची कीव येते. विकासाच बोला ना. गाडीत बसणाऱ्यांना त्रास होईल बाकीच्यांना त्रास होण्याचं काय कारण. आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो. गर्दीचा त्रास आम्हाला होईल की नाही हे आमचं आम्ही ठरवू ना. आमच्या काही जवळच्याच लोकांनी ते काम मनावर घेतलंंय त्यांना आमच्या शुभेच्छा असा टोला अजित पवार यांनी लगावला.