फडणवीसांनी नेते घडवले नाही तर चोरले; अंधारेंनी पक्षफोडी ते इमेज सगळंच काढलं

फडणवीसांनी नेते घडवले नाही तर चोरले; अंधारेंनी पक्षफोडी ते इमेज सगळंच काढलं

Sushma Andhare On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) नेते घडवले नाहीतर दुसऱ्या पक्षाचे नेते चोरले असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पक्षफोडी ते इमेजपासून सगळंच बाहेर काढलं आहे. दरम्यान, पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

राज्यात ८ हजार कोटींचा घोटाळा, अ‍ॅम्ब्युलन्समधून पैस खाण्याचा सरकारचा धंदा; वडेट्टीवारांनी फटकारले

सुषमा अंधारे म्हणाल्या, चाणक्य नेते घडवत असतात, पण देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच पक्षाचे नेते चोरले आहेत. वेगवेगळ्या पक्षातून लोकं चोरुन आणून ते भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी नेते घडवले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना दरवेळीच ऑफर द्यावी लागते, तशीच ऑफर त्यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिली असल्याचं सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे. मात्र, निष्ठावंताना ऑफर देण्यासाठी ताकद आणि हिंमत लागत असल्याचा टोलाही अंधारेंनी यावेळी लगावला आहे.

पेपरफुटी प्रकरणी सत्यजित तांबेंनी लक्ष वेधलं; शासनाकडे केली ‘ही’ मागणी

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दोन-तीन पक्ष फोडले आहेत, स्वत:ची इमेज खराब करुन घेतली, एवढं सगळ करुनही पुढची ड्राईव्हिंग सिट मिळत नसेल तर आणि कायम वडापमध्ये बसल्यासारखं मागे दाटीवाटीत बसावं लागत असेल तर मला बहीण म्हणून वाईट वाटत असल्याची जळजळीत टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

430 कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप : अडचणीत आलेल्या अभिजीत पाटलांचे केंद्राकडे बोट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही गाडीत मंत्री गिरीश महाजनांसोबत बसावं लागतंय हे महाजनांचं प्रमोशन की अजित पवारांचं डिमोशन हेच समजत नाहीत. अजित पवार यांनी तर त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी इनोव्हा गाड्या दिल्या आहेत, याचं वाईट वाटत असल्याचंही अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडलं नाही. त्या म्हणाल्या, मला माहित आहे त्यावरुन शिवसैनिका कधीच कोणत्याच पक्षाचा गमछा घातलेला नाही, पण शिंदे गटाचे आमदार तर भाजपची पालखी वाहुन घेण्यात दंग आहेत. शिंदेच्या गळ्यात कमळाचा गमछा घातल्याचं पाहिलं, पण हे सगळं द्योतक आहे शिवसेना पक्ष गुजरातवाल्यांना विकण्याचं, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube