राज्यात ८ हजार कोटींचा घोटाळा, अ‍ॅम्ब्युलन्समधून पैस खाण्याचा सरकारचा धंदा; वडेट्टीवारांनी फटकारले

  • Written By: Published:
राज्यात ८ हजार कोटींचा घोटाळा, अ‍ॅम्ब्युलन्समधून पैस खाण्याचा सरकारचा धंदा; वडेट्टीवारांनी फटकारले

Ambulance scam : राज्यात सातत्याने घोटाळ्याची प्रकरणं समोर येत आहेत. नुकताच तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच आता अ‍ॅम्ब्युलन्सच्या कंत्राटात तब्बल 8 हजार कोंटींचा घोटाळा (Ambulance contract scam) झाल्याची बाब समोर आली आहे. साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं. .यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) चांगलेच आक्रमक झाले. घोटाळ्याचं टेंडर रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

…म्हणून सरकारमध्ये बसलेल्यांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे; रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत 

अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याआधी औषध घोटाळा, भरती घोटाळा असे अनेक घोटाळे आरोग्य खात्यात उघडीस आले. तर आता अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा उघडीकस आला. त्यामुळं गरीब आणि गरजूंसाठी आधार असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्समधून सरकारने पैसे कमावण्याचा उद्योग सुरू केला, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं की, साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्सची किंमत सुमारे 50 लाख रुपये असते. 1,529 अ‍ॅम्ब्युलन्सन्सचे प्रति अ‍ॅम्ब्युलन्स 50 लाख रुपये या प्रमाणे एकूण 764 कोटी 50 लाख रुपये होतात. 800 कोटी रुपयात होणाऱ्या या कामासाठी 8000 कोटी रुपये खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे, हे राज्यातील जनतेला माहीत आहे.

दावोस दौऱ्यातून CM एकनाथ शिंदेंचं गुंतवणूकदारांना साकडं, म्हणाले, ‘भारताच्या विकासगाथेत….’

अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना ‘बदलीची’ भीती दाखवून साडेतीन-चार हजार कोटींचं टेंडर 8 हजार कोटीपर्यंत फुगवल्याचे उघड झालं. महायुती सरकारमधील अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा आता उघडकीस आला असून अ‍ॅम्ब्युलन्सपुरवठ्याची निविदा रद्द करावी, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे करून घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, ही आमची मागणी आहे, असं ट्वीट त्यांनी केलं.

दरम्यान, पेपरफुटीमुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.

हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरचे आरोप मागे घ्यावेत. परीक्षार्थीं भावना लक्षात घेऊन शासनाने तलाठी पद भरती प्रक्रिया रद्द करावी. तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube