पेपरफुटी प्रकरणी सत्यजित तांबेंनी लक्ष वेधलं; शासनाकडे केली ‘ही’ मागणी
Ahmednagar News : राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असताना यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात पेपर फुटणार नाही. यासाठी पेपरफुटी विरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) एका मुलाखतीत केली.
मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर
यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणतीही अवास्तव मागणी न करता विद्यार्थ्यांनी वास्तव आणि मान्य होणाऱ्या मागण्या केल्या तर मी स्वतः विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील, असे सत्यजीत तांबे म्हणाले. युवकांनी फक्त सरकारी नोकरी हे अंतिम ध्येय न ठेवता खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडे वळले पाहिजे.
ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; पत्नीसाठी खिलाडी कुमारची खास पोस्ट, म्हणाला…
सरकारी नोकरीत असलेली शाश्वती, प्रतिष्ठा आणि पैसा या कारणांमुळेच युवक मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीकडे वळलेला आहे. सध्या खासगी नोकरीत देखील चांगला पैसा आणि प्रतिष्ठा आहे. मात्र, युवक त्याकडे दुर्लक्ष करतात, अशी खंत आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
माझं पद अवैध होतं तर अमित शाहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
राज्य सरकार नोकर भरती करताना एखाद्या नामांकित खासगी कंपनीला निविदा देत असते. मात्र, खासगी कंपन्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची भरती करते. या कंपन्यांना देखील भरती करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि उलट तपासणी करून कर्मचाऱ्यांची भरती करावी.
दरम्यान, राज्य सरकारने नोकर भरती करणाऱ्या कंपन्यांना निविदा देण्यापूर्वी एक जरी पेपर फुटला, तर मोठा दंड आकारावा, असे जेणेकरून कोणतीही कंपनी पेपर फोडण्याचे धाडस करणार नाही, असेही भाष्य आ. सत्यजीत तांबेंनी केले.