माझं पद अवैध होतं तर अमित शाहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.
सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार हे भाजपचे अध्यक्ष बोलले आहेत. असं लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आहेत. त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशहीच्या खुनाला सुरुवात केली आहे. लोकशाहीच्या हत्याऱ्यांनाा माहीत नाही की महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही. तिथल्या तिथे गाडून टाकते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मला सत्तेचा मोह नव्हता, एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं होतं. राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलं होतं ते असंविधानिक होतं. आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार की लवाद त्यांच्या डोक्यावर बसणार. हे पाहण्याची लढाई आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जाहीर पाठिंबा देतो, नार्वेकरांना हाकला; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान
सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा, ही लढाई लवकरच होणार आहे. आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल. ते म्हणतील त्या दिवशई मी घरी बसेन. पण लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही? समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटी मानली तर मग 2014 ला मलाय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी दाखवलंच नाही’; हातात SC चा निकाल घेत नार्वेकरांचं चोख प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे हा निकाल दिला होता. त्यांना सांगितलं होतं की पात्र अपात्र ठरवा. ते त्यांनी ठरवलं नाही. आता शिंदे हायकोर्टात गेलेत की ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही? त्यांनी देखील एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मग त्यांना दुसरं आव्हान देतो की तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना मी विनंती करतो जसं त्यावेळी राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा, जाहीर पाठिंबा देतो हाकला ह्यांना, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर (RAHUL NARVEKAR) केला आहे.