‘माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी दाखवलंच नाही’; हातात SC चा निकाल घेत नार्वेकरांचं चोख प्रत्युत्तर
Rahul Narvekar On Udhav Thackeray : माझं कुठं चुकलं हे उद्धव ठाकरेंनी दाखवलंच नसल्याचं चोख प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलं आहे. दरम्यान, मुंबईत आज उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाकडून अपात्र आमदार प्रकरणावरील निकालावरुन राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नार्वेकरांनी विधीमंडळ सभागृहात पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल नार्वेकरांनी भरत गोगावलेंची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली नसल्याचा दावा केला आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा; काँग्रेस नेत्यांच्या सहभागी होण्यावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले…
नार्वेकर म्हणाले, काही लोकांकडून जनतेत गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे जनतेला काय खरं खोटं हे समजणं आवश्यक असून तेच सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे. नूकतीच ठाकरे गटाची पत्रकार परिषद झाली. ही परिषद पाहून परिषदेला दसरा मेळावा म्हणावं की गल्लीबोळातली भाषणाची मालिका? या पत्रकार परिषदेत माझं कुठं चुकलंय हे उद्धव ठाकरे गटाकडून दाखवण्यातच आलं नसल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच माझ्याकडून काही चूक झाली का हे दाखवण्यात येईल असं वाटलं पण राजकीय भाषणं आणि संविधानिक संस्थांवर आरोप केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला. निवडणूक आयोगालाही चोर म्हणलं गेलं हे दुर्देवी असून संविधानिक संस्थांविषयी असे शब्दप्रयोग करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालय ,निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष कोणावरच विश्वास नाही तर संविधानावर कसा विश्वास असू शकतो हा प्रश्न पडला, असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.
Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
सर्वोच्च न्यायालयाच्या विपरित निर्णय घेतला असं ते म्हणतात, शिंदे आणि गोगावलेंच्या नियुक्तीला वैध केल्याचं सांगितलं आहे. पण खोट्यापेक्षा अर्धसत्य सांगणं हे घातक असतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात 95 पॅसेजमध्ये म्हटलं की, व्हिपला नियुक्त करतो तेव्हा अध्यक्षांचा निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून त्याचं व्यक्तीला रेकिंगनेशन देणं आवश्यक असतं. 21 जून 2022 ला उपाध्यक्षांनी अजय चौधरींच्या नियुक्तीला आणि सुनील प्रभुंच्या नियुक्तीला मान्यता दिली तेव्हा त्यांच्यासमोर ठाकरेंचं एकच पत्र होतं. त्यामुळे विधी मंडळ पक्षात फुट पडलेली आहे असा पुरावा कोणताही नव्हता म्हणून ही राजकीय पक्षाची भूमिका समजून हे योग्य आहे हे ग्राह्य धरुन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याचं नार्वेकर म्हटले आहेत.
मी निर्णय दिला तेव्हा माझ्यासमोर राजकीय पक्षाचे दावे होते ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन दावे होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, मूळ राजकीय पक्ष कोणता हे निश्चित करा मग आपण ज्याला आपण मूळ पक्ष घोषित करता त्या राजकीय पक्षाच्या व्हिपवर निर्णय घ्या मग पात्र अपात्र ठरवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावलेंची नियुक्ती अवैध ठरवली नाही. मी 10 जानेवारील रोजी अपात्र आमदार प्रकरणावर दिलेला निकालसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसारच निकाल दिला असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी ठणकावून सांगितलं आहे.