‘संजय राऊतांसारखे भूत आवरा’; जहरी टीका करत गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

‘संजय राऊतांसारखे भूत आवरा’; जहरी टीका करत गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Gulabrao Patil Criticized Sanjay Raut : राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असेल पण आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. उलट पक्ष वाचविण्यासाठीच आम्हीच वेगळे झालो होतो. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच आमचा त्यांना सल्ला आहे, अशी खोचक टीका मंत्री पाटील यांनी केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचा निकाल दिल्यानंतर (Shivsena MLA Disqualification Case) मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

पाटील पुढे म्हणाले, ज्यांना घटना सुद्धा माहिती नाही ते पक्ष काय चालवणार. ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांना ही मोठी चपराक आहे. शिवसेनेने जो पवित्रा घेतला होता तोच पवित्रा अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला आहे. हा निकाल अन्यायकारक नाही. ज्या चाळीस लोकांनी तुम्हाला पक्ष वाढविण्यासाठी तुम्हाला सावध केलं होते. त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले. याचा विचार करायला पाहिजे होता पण केला नाही. आम्ही गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवण्याचं काम केलं, असे पाटील म्हणाले.

ठाकरे अन् शिंदे गटाचे आमदार पात्र; राहुल नार्वेकरांनी दिला ऐतिहासिक निकाल

नेमका निकाल काय ?

देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल अखेर जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधी मंडळात अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल वाचून दाखवला. या निकालात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत. या निकालामुळे दोन्ही गटाला दिलासा मिळाला आहे.

नार्वेकरांनी सुरूवातील विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय दिला. यावेळी नार्वेकरांनी निर्णय देताना सांगितलं की, दोन्ही गटाच्या नेत्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. मात्र, दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करण्यात आली. यावरही तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 च्या संविधानाची प्रत होती. त्यामुळे 2018 मध्ये केलेल्या बदलांचा विचार करण्यात आला नाही. ठाकरे गटाने 2018 मध्ये केलेली दुरुस्ती चुकीची असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज