Uddhav Thackeray : ‘हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटण्याची गरज मला नाही’; ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?

Uddhav Thackeray : ‘हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटण्याची गरज मला नाही’; ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?

Uddhav Thackeray : आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) महत्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीत आहेत. या बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांवर नाव न घेता खोचक शब्दांत टोलेबाजी केली. पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या मु्ख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला होता. 2024 मध्ये अजित पवारच मुख्यमंत्री होतील असे दावे होत असल्याचे विचारले. त्यावर उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. अजून तरी त्यावर कर लागलेला नाही. पण, भविष्यात काही सांगता येत नाही. ते उद्या असंही म्हणू शकतात की तुम्हाला पंतप्रधान पदाचं स्वप्न पडलं होतं चला आता कर भरा. पण, जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत ज्यांना स्वप्न पहायचं आहे त्यांना पाहू द्या.

Uddhav Thackery : आमचा प्रश्न अदानींना होता, गावभर चमचे का वाजताय?; ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका

यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. आज दिल्लीत आलोय म्हटल्यानंतर आघाडीतील सगळ्याच नेत्यांच्या भेटी घेणार आहे. आता जरी थंडीसाठी जॅकेट घातलं असलं तरी मला हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटण्याची गरज नाही. जे करतो ते खुलेआम करतो, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. दरम्यान, मागील वर्षी सत्तांतरावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वेश बदलून राजकीय बैठकांसाठी जात असत असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीच केला होता. त्यावेळी या वक्तव्यावर बरीच चर्चाही झाली होती. उद्धव ठाकरे यांचं आजचं वक्तव्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या या वेशांतराला खोचक टोला असल्याचं आता सांगितलं जात आहे.

मी स्वप्न पाहत नाही, ज्यांना पहायचंं त्यांना पाहू द्या

आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. मी नेतृत्वाबाबत स्वप्न पाहत नाही. मुख्यमंत्रिपद मी जबाबदारी म्हणून स्वीकारलं होतं. ज्यावेळी पद सोडण्याची वेळ आली तेव्हा क्षणात सोडूनही दिलं, असे म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देशात सध्या ज्या घटना घडत आहेत त्यावरून लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमची त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

Ajit Pawar : ‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’; अजितदादांनी सांगितलं पडद्यामागचं पॉलिटिक्स

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज