Lok Sabha Election : ‘एक दिवस पंतप्रधानपदी विराजमान होऊ’; भाजपाच्या जुन्या मित्राचं चॅलेंजिंग वक्तव्य

Lok Sabha Election : ‘एक दिवस पंतप्रधानपदी विराजमान होऊ’; भाजपाच्या जुन्या मित्राचं चॅलेंजिंग वक्तव्य

Lok Sabha Election : देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. भाजपाचे एकेकाळचे घनिष्ठ सहकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीच पंतप्रधान होण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा. विजय आपलाच आहे. कोणत्याही परिस्थितीत एक दिवस आपण या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. फलटण येथे पक्षाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Lok Sabha Election : ‘2024 साठी मी तयारच’ राम शिंदेंनी ठोकला विखेंविरोधात शड्डू!

या शिबिराच्या समारोप सत्रात जानकर यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. यानंतर या शिबिरात अन्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. राजकीय विश्लेषक प्रा. मनोज निगडकर यांनी सांगितले की दहा वर्षांपूर्वी जानकर यांनी महिलांना राजकारणात 50 टक्के भागीदारी मिळाली पाहिजे असं सांगितलं होतं. ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली होती. यासह प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला समान प्रमाणात सर्व क्षेत्रात भागीदारी मिळायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.

भाजपबरोबर गेलो हीच मोठी चूक

जानकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीतील विटा येथे भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. भाजप (BJP) ज्यावेळी सत्तेत येत नव्हता त्यांना दीड ते दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आमच्याशी युती केली. सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखत पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यावेळी जानकर (Mahadev Jankar) म्हणाले होते.

मला मंत्री करून भाजपने उपकार केले नाहीत’ जानकर भाजपवर भडकले

दरम्यान, जानकर (Mahadev Jankar) यांनी आता लोकसभा निवडणुकीचीही तयारी केली आहे. लोकसभेसाठी थेट उत्तर प्रदेशातून त्यांनी तयारी केली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्जापूर मतदारसंघातून तिकीट फायनल असल्याचेही त्यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्यामुळे एकंदरीतच त्यांनी आता लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube