Lok Sabha Election : ‘2024 साठी मी तयारच’; राम शिंदेंनी ठोकला विखेंविरोधात शड्डू!

Lok Sabha Election : ‘2024 साठी मी तयारच’; राम शिंदेंनी ठोकला विखेंविरोधात शड्डू!

Lok Sabha Election : यंदा लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) नगर जिल्ह्यात हायहोल्टेज लढती रंगणार अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलल्याने येथील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे.  राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे पुत्र सुजय विखे (Sujay Vikhe) विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभेसाठी त्यांनी तयारी सुरू केली असली तरी त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण, भाजप नेते आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी नगर शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहोत फक्त पक्षाने आदेश द्यावा असे स्पष्टपणे सांगून टाकले. त्यांच्या या जाहीर घोषणेने खासदार विखेंचे टेन्शन मात्र वाढणार आहे.

येत्या काळात लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत त्यादृष्टीने नगर जिल्ह्यातून देखील आता उमेदवारांकडून हालचालींना वेग आला आहे. यात नगर दक्षिणची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे दिसून येऊ लागले आहे एकीकडे सुजय विखे लोकसभेसाठी तयारी करत असतानाच पक्षातूनच त्यांना आता मोठे आव्हान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार राम शिंदे आपण 2024 ची लोकसभा पूर्णपणे सज्ज असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले. पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, असे आ. शिंदे म्हणाले.

Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’

पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून मी काम करत आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही पार पाडत आहे. त्यामुळे पक्षाकडे उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करणं यात काही गैर नाही. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये विचारणा करण्यात आली होती. आता 2024 साठी मी उमेदवारी करू इच्छित आहे.  2024 च्या लोकसभेसाठी मी पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार आहे. नेतृत्वाने आणि पक्षाने येण्याची आवश्यकता आहे त्यानंतर हा निर्णय सकारात्मक दृष्टीने पुढे जाईल त्यावेळेस मी निवडणुकीसाठी सज्ज असेल असेही शिंदे म्हणाले.

विखे आणि माझ्यात नाराजी नाही 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त कोहिनूर मंगल कार्यालय येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मंचावर भाषण करत असताना राम शिंदे यांनी सर्व कार्यक्रम उत्तरेकडेच का घेतले जातात अजून दक्षिणेत देखील घेतले जावे अशी मागणी मंत्री विखे यांच्यासमोरच केली होती. यावरून शिंदे विखेंमध्ये नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर बोलताना शिंदे म्हणाले, की आमच्या मध्ये नाराजी नाही मात्र काही कार्यक्रम हे दक्षिणेकडे देखील घेतले जावेत यावर विखेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो आहे त्यामुळे असे कार्यक्रम देखील समसमान झाले पाहिजेत अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

Video : बारामतीमध्येच अजित पवार सापडावा, फक्त मला ‘काका’ म्हणू नको; राज ठाकरेंची टोलेबाजी

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube