Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’

Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’

Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा  (Lok Sabha Election) चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. आताही राज्याचं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या रुपात नगर जिल्ह्याकडेच आहे. अशा राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेच्या जागेसाठी जास्तच राजकारण पाहण्यास मिळत आहे. ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आ. रोहित पवार आणि आ. प्राजक्त तनपुरे यांची नावे पुढे केली जात आहेत. यांपैकी कुणालाही तिकीट मिळालं तरी विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही एवढं मात्र नक्की.

आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी आता राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधील शरद पवार गटाच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची मुंबईत राष्ट्रवादी भवनमध्ये आढावा बैठक पार पडली. याबैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नावाची चर्चा होती.

Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा

आगामी लोकसभेच्या दृष्टीने झालेल्या या महत्वाच्या बैठकीला स्वत: शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ.अनिल देशमुख, आ.जितेंद्र आव्हाड, जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. राहुल जगताप, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे आदी उपस्थित होते.

रोहित पवार की प्राजक्त तनपुरे ?

लोकसभेच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून काही इच्छुकांची नावे देखील समोर येऊ लागली आहे. यातच आता मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक आगामी लोकसभेच्या दृष्टीने पार पडली. यावेळी नगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवार कोण असावा यासंदर्भात चर्चा झाली. नगरचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नगर लोकसभा जिंकायची असल्यास एक तर सामान्य चेहरा अथवा आ. रोहित पवार किंवा आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या उमेदवारांची गरज असल्याचे स्पष्ट केले.

ललित पाटील अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत; नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

निलेश लंकेंच्या मनात काय ?

नगर दक्षिण लोकसभा अत्यंत प्रतिष्ठेची बनू लागली आहे. कारण विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी देखील पुन्हा लोकसभेसाठी जय्यत तयारी केली आहे. यातच त्यांना कट्टर स्पर्धक असलेले अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी देखील लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. एकीकडे असे असले तरी विखेंना पक्षातील अंतर्गत वाद देखील अडचणीचा ठरू शकतो. नुकतेच भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी देवदर्शनानिमित्त एकत्र एकाच वाहनातून प्रवास केल्याने राजकारणाची गणित बदलतात की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

विखेंपुढे शिंदेंच्या नाराजीचं आव्हान 

लोकसभेसाठी विखेंना पक्षातून आमदार शिंदे यांची नाराजी दूर करण्याचे हे देखील मोठे आव्हान आहे. तसेच ठाकरे गटाने देखील लोकसभेसाठी शंकरराव गडाख यांना पुढे केले आहे. यामुळे यंदाची नगर दक्षिण लोकसभा चांगलीच गाजणार हे दिसत आहे. तरी विखे पाटील राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का या प्रश्नाचे उत्तर आगामी काळातील राजकीय घडामोडींतून नक्कीच मिळेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube