Video : बारामतीमध्येच अजित पवार सापडावा, फक्त मला ‘काका’ म्हणू नको; राज ठाकरेंची टोलेबाजी
पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) रामराम ठोकत राष्ट्रवादीत उभी फूट पाडत अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी टिकेची झोड उठवली. मात्र, याकडे अजितदादांनी कधी उत्तर दिली तर, कधी कानाडोळा केला. पण, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अजित पवारांना उद्देशून मला कधी काका म्हणू नको असं सल्ला देत टोलेबाजी केली आहे. ते मनसेच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घटन राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं त्यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली आहे.
Pune News : समर्थकाकडून बिल्डरला बेदम मारहाण; आमदार लांडगेंनी मागितली माफी
बारामती लोकसभा मतदार संघाच्या कार्यलयाच्या उद्घाटनावेळी अजित पवार नावाचा व्यक्ती सापडावा तो चांगला कार्यकर्ता आहे. मात्र, आयुष्यभर आपल्याला काका म्हणू नकोस अशी मिश्किल टिपण्णी राज ठाकरे यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी वसंत मोरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
राज ठाकरे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघाचे काम वसंत मोरेंकडे आहे. बारामतीमध्येच अजित पवार सापडावा असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे बोलताना राज म्हणाले की, आज हे (अजित पवार) कुठच्याही पक्षात जातात की काय असे वाटले. पण हा आपला बरोबरचा सहकारी असल्याचे सांगत मला आयुष्यात कधी काका म्हणू नकोस असा सल्ला राज यांनी अजित पवार नावाच्या कार्यकर्त्याला दिला.
World Cup 2023 : टीम इंडियासाठी थोडी खुशी, थोडा गम; बांग्लादेशला हरवूनही फायदा नाहीच
पुणे जिल्ह्यात मनसेचं नेटवर्क तयार करणार
आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांकडून मोर्च्येबांधणी केली जात आहे. भाजपनेदेखील शरद पवार गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदार संघाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या मनसेकडून पुणे जिल्ह्यातील गावागावात पक्षबांधणीच्या (Maharashtra Politics) कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. सध्या त्यांनीही बारामतीकडे जास्त लक्ष दिले आहे. या मतदारसंघात पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
मनसेचा पहिला खासदार 100 टक्के मीच असेन, पण…
काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते आमदार म्हणून तुमच्याकडे (Maharashtra Politics) पाहत आहेत याबद्दल विचारले असता मोरे म्हणाले की, नाही. मला तर यावर्षी खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार होण्यास मी इच्छुक आहे. मला वाटतं की माझ्या पक्षाने मला संधी दिली तर, यावर्षी महाराष्ट्रातला पहिला मनसेाचा खासदार हा वसंत मोरे 100 टक्के असेल असे मत मोरेंनी बोलून दाखवले होते.