Sanjay Raut : ..तर भाजपला प्रभू श्रीरामही वाचवू शकणार नाहीत; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Criticized BJP : 2024 ला देशात आणि राज्यात (Lok Sabha Election 2024) परिवर्तन होईल, ईव्हीएमविषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहेत उद्या हे ईव्हीएमबाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही? आपण विष्णूचे 13 वे अवतार आहात मग बॅलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? असे सवाल उपस्थित करत अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाही. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
Lok Sabha 2024 : होय, लोकसभा लढणारच! राणी लंकेंच्या घोषणेने नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, शिंदे (Eknath Shinde) दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. मात्र आम्ही 25 वर्षे त्यांच्या प्रेमात होतो पण फसवणुकीतून आमचा प्रेमभंग झाला. काल परवा आले आणि प्रेमात पडले. हे प्रेम टिकत नाही. सत्ता असेपर्यंत हे प्रेम टिकेल. हे प्रेम नाही तर सत्ता आणि ईडीची भीती बोलत आहे.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला का घाबरता ?
2024 ला देशात आणि राज्यात (Lok Sabha Election 2024) परिवर्तन होईल, ईव्हीएम विषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहेत उद्या हे ईव्हीएमबाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही? आपण विष्णूचे 13 वे अवतार आहात मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? असे सवाल उपस्थित करत अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाही. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.
ईव्हीएमच्या माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. इतका महान शक्तिमान नेता का घाबरतो, जगात कुठेही ईव्हीएम निवडणूक आता नाही. देशात 19 लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो. मध्य प्रदेश निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर होते, ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले.