Sanjay Raut : काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत, संजय निरुपम कोण? राऊतांच्या वक्तव्याने जागावाटपाचा तिढा वाढला

Sanjay Raut : काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत, संजय निरुपम कोण? राऊतांच्या वक्तव्याने जागावाटपाचा तिढा वाढला

Sanjay Raut : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा (Lok Sabha Election) जागावाटपाचा मुद्दा तापू लागला आहे. याच मुद्द्यावर महाविकास आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. संजय राऊत 23 जागांची (Sanjay Raut) यादी घेऊन आमच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर इतक्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा निर्णय दिल्लीत होणार असल्याची माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, कोण किती जागा लढणार हे दिल्लीत ठरणार आहे. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही हे आधीच ठरलं आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद जास्त असेल तिथे काँग्रेस निवडणूक लढेल. उद्धव ठाकरे सुद्धा वरिष्ठांबरोबर चर्चा करत आहेत. मतभेद असण्याचं कारण नाही असे स्पष्ट करत संजय निरुपम कोण काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असा टोला राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut : भाजप रणछोडदास! त्यांचा जन्मच 2014 नंतरचा, इतिहास काय माहित? राऊतांचा हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube