Sanjay Raut : भाजप रणछोडदास! त्यांचा जन्मच 2014 नंतरचा, इतिहास काय माहित? राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते भडकले आहेत. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या काही नेत्यांकडून या देशाची निर्मिती 2014 नंतर झाल्याचा दावा केला जातो. पण देशातील कोणत्याही साहसी लढ्यात किंवा संघर्षात भाजपाचा समावेश नव्हता. भाजप रणछोडदास पार्टी असून त्यांचा जन्मच मुळात 2014 चा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी आगपाखड केली.
भाजप रणछोडदास, यांचा इतिहासाशी संबंध नाही
राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले, भाजपमधील चटण्या, लोणच्यांकडे फार लक्ष देणं गरजेचे नाही कारण इतिहास साक्षीला आहे. इतिहास आणि भाजपचा काही संबंध नाही.देशाचा इतिहास घडवण्यामध्ये मग तो देशाचा स्वातंत्र्यलढा, मुंबईचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अयोध्या आंदोलन अशा लढ्यात हे लोक नव्हते त्यामुळे यांना दुसऱ्यांविषयी पोटदुखी आहे. हे कधी भगतसिंग, पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाहीत, हे काहीच घडवू शकले नाहीत. मुळात भाजपाचा देश 2014 नंतर निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देखील 2014 नंतरच निर्माण झाला आणि अयोध्या आंदोलन त्याआधीचे आहे. हे पळकुटे आहेत, हे रणछोडदास आहेत, इतिहास हा भाजपने पाहिला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली.
Ram Mandir Trust कडून आधी नकार आता निमंत्रण; जोशी-अडवाणी लावणार प्राणप्रतिष्ठेला हजेरी
भाजपाची मानसिक स्थिती ठीक नाही. 2014 नंतर जन्माला आलेली ही बालके आहेत, यांना आधीचा भारत आधीचा संघर्ष, आधीचा इतिहास माहित नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात ना कुठे औषधाला दिसत आहेत. लढण्याच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये हे होते हे त्यांनी सांगावे मग लोणची पापड विकत बसावे. लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसण्याचे भाजपाचे कामच आहे. जे लोक म्हणतात 2014 साली भारत निर्माण झाला, यांचा जन्मच 2014 नंतर झालेला आहे त्यामुळे यांना आधीचा इतिहास माहीत नाही, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
या देशात श्रीरामांपेक्षा कुणी मोठा झाला आहे का ? कोण नवीन ब्रह्मदेव जन्माला आला आहे का ? कुणी जन्माला घातला आहे का? जे रणछोडदास ज्यांचा जन्म 2014 नंतर झाला ते रामा पेक्षा कधी मोठे झाले असा सवाल संजय राऊत यांनी केला.