Sanjay Raut : तुकाराम मुंडेंचे नाव घेत राऊतांनी सांगितला ‘महानंद’ वाचवण्याचा मास्टर प्लॅन

Sanjay Raut : तुकाराम मुंडेंचे नाव घेत राऊतांनी सांगितला ‘महानंद’ वाचवण्याचा मास्टर प्लॅन

Sanjay Raut : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांवरून राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी मंडळीही यावर उत्तर देत असून हे का घडलं याचा खुलासा करत आहेत. आर्थिक घडी विस्कटल्याने एनडीबीबीच्या ताब्यात महानंदचा कारभार जाईल असे सांगितले जात आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करून हा प्रकल्प राज्यातच राहावा अशी विरोधकांची इच्छा आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबावही आणला जात आहे. यातच आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांचं नाव घेत एक ट्विट केलं आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारखे चांगले कडक अधिकारी राज्यातील अनुभवी चांगले संचालक घेऊन महानंद चांगल्या रितीने चालवू शकतात, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महानंदला कसं वाचवता येईल याचा उल्लेख केला आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारखे चांगले कडक अधिकारी व दूध व्यवसायातील महाराष्ट्रातील अनुभवी चांगले संचालक घेऊन महानंद चांगल्या रितीने चालवू शकतो. एनडीबीबीला 350 कोटी रुपये शासन देणार आहे त्याऐवजी 125 कोटी कर्मचारी व्हीआरएससाठी महानंदला दिले तर महानंद अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकते व एनडीबीबीच्या ताब्यात जाण्यापासून वाचू शकते.

याआधी महानंदचे दीडशे कोटी रुपये ठेवी शिल्लक होत्या तसेच गतवर्षी अजितदादांनी दूध पावडरचे 80 कोटी रुपये शासनाचे माफ केले आता हे सर्व पैसे संपले आहेत म्हणून महानंद एनडीबीबीला देण्याचा डाव आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : ‘निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण’.. राऊतांनी ठणकावलं!

राऊतांनी तुकाराम मुंडेंचच नाव का घेतलं ?

आयएएस तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी किंवा कामांसाठी महाराष्ट्रात ओळखले जाते. तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde Transfer) जेवढे आपल्या कामाने गाजले किंवा लोकप्रतिनिधीबरोबरच्या संघर्षामुळे गाजले त्यापेक्षा जास्त गाजले ते त्यांच्या सततच्या बदलींमुळे. तुकाराम मुंडे हे करड्या शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. एखादा अधिकारी उशिरा आलाच तर त्या अधिकाऱ्यांचा हाफ डे लावणे, सुट्ट्या लावणे किंवा नोटीसा पाठवल्या जातात.तुकाराम मुंडेंची काम करण्याची पद्धत साधी सरळ आहे असे बोलले जाते. पण नियमांवर बोट ठेवणारी आहे. तुकाराम मुंडेंना त्यांच्या कार्यशैलीमुळे माध्यमात आणि लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली.

सरकारी संस्था आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा मुंडेंना अनुभव आहे. नागपूर महापालिका आयुक्त असताना त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले होते. तसेच पुण्यातील पीएमपीएमलचे अध्यक्ष झाल्यानंतर फक्त दोन महिन्यात संंस्थेचे उत्पन्नात वाढ करण्याची किमया मुंडेंनी करून दाखवली होती. जून 2017 मध्ये पीएमपीएमलचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंडेंनी कारवाईचा धडाकाच लावला होता. कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांनी भाडोत्री बसवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे पीएमपीएमलच्या उत्पन्नात वाढ झाली. दोन महिन्यात सहा कोटींनी उत्पन्न वाढले होते.

IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज