Sanjay Raut : महानंदच्या 27 एकरवर गुजरात लॉबीचा डोळा; राऊतांचा सरकारवर हल्ला

Sanjay Raut : महानंदच्या 27 एकरवर गुजरात लॉबीचा डोळा; राऊतांचा सरकारवर हल्ला

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडचणीत आलेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरीच्या विस्कळीत होण्यामागे महानंदाची 27 एकर जमीन जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस

यावेळी संजय राऊत म्हणाले की, गेल्या ४ महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना पगार नाही आहे. सरकारला त्यांच्याकडे पगार द्यायला पैसा नाही आहे, तर पैसा कुठे जात आहे? आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून पगार दिला नाही आहे. महानंदा व्यवस्थापन विस्कळीत करण्याचे कारण एकच आहे. ते म्हणजे जमीन 27 एकर जमीन महानंदाचे या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे.

Pune : खासदार सोडा आमदारही होऊ देणार नाही; धंगेकरांना भाजप शहराध्यक्षांचं ओपन चॅलेंज!

ज्यांना ही जमीन विकली जाणार आहे. ते परजणे कोण आहेत? कोणाचे मेहुणे, साडू हे मंत्रिमंडळ मधले कोणाचे कोणतरी आहेत? ते सांगावं. महानंदाचे 27 एकर जमीन एका लॉबीच्या घशात घालणं चालू आहे. शिवसेनेचे या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे. आमदार यांना तुमच्याकडे द्यायला पैसे आहेत. पण कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही. महानंदा आणि अंगणवाडीचा प्रश्न शिवसेनेने गांभीर्याने घेतला आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; अब्दुल सत्तार म्हणाले, लाठीचार्ज करा, इतकं मारा की…

27 एकर जमीन कोणाच्या घशात घालणार आहे? यावर शिवसेनेचे लक्ष आहे. कवडीमोलमध्ये तुम्ही जमीन विकत आहे. त्याबद्दल सरकारला काय भेटत आहे? जर ते बिल्डरांच शिस्त मंडळ असतं. तर त्यांना न्याय मिळाला असता, त्या गरीब सेविका आहेत. त्यांना चार महिन्यांपासून पगार भेटला नाही आहे. काम करण्यासाठी अजित पवार जर गाड्या देणार असतील, तर शिंदे गट हेलिकॉप्टर देतील, मर्सडीज देतील. महाराष्ट्रातही तीच स्पर्धा सुरू आहे. कोण किती खर्च करत आहे? पण अंगणवाडी सेविका आणि महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही. अशा शब्दांत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज