Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस
Ira khan-Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira khan) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) नोंदणीकृत विवाह केला आहे. तिच्या लग्नाला अंबानी कुटुंबासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत पोज दिली. तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहेत.
View this post on Instagram
आमिर खानचा यातील एक व्हिडिओ संपूर्ण कुटुंबासह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या दोन पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि रीना दत्ता (Reena Dutta) यांच्यासोबत एका फ्रेममध्ये पोज देताना दिसत आहे. यामध्ये अभिनेत्याचे दोन्ही मुलगे, दोन्ही पत्नी आणि समाधान देखील एकत्र पोज देत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. चाहत्यांना ते खूप आवडलं आहे.
व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट बघायला मिळाली आहे की, पण भर मंडपात पहिली बायको रीना दत्तासमोर दुसऱ्या बायकोला अर्थात किरण रावला किस केल्याने आमिर सध्या चर्चेत आहे. शिवाय, तो त्याचा लहान मुलगा आझादच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. सोबतच अभिनेता आणि आयरा खानची सासू प्रीतम शिखरे यांच्यासोबत व्हिडिओमध्ये पोज देताना दिसत आहे. यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
मुंबईतील हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचे लग्न, हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना नको त्या अटी?
रीना दत्ता आणि किरण राव या दोघीही आमिर खानच्या माजी पत्नी आहेत. अभिनेत्याने दोघांना घटस्फोट दिला आहे. अभिनेता त्याच्या दोन्ही पत्नींना कुटुंबाप्रमाणे वागवतो. या दोघांशीही त्याचे काही वैर आहे असे वाटत नाही. घटस्फोटानंतरही आमिर आपल्या पत्नीसोबत लंच आणि डिनरला जात असतो. तो अनेकदा स्पॉट झाला आहे.