Aamir Khan चं चीन-पाकिस्तानवर जास्त प्रेम; ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकरी भडकले
Amir Khan on Chania : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे देशात चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकला जात आहे. या दरम्यान आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या अभिनेता आमिर खानला चीनसाठी केलेली एक गोष्ट चांगलीच महागात पडली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊ… (Amir Khan troll for promotion of Chania film)
Tina Datta: ‘या’ लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्रीची प्रकृती खालावली; अन् सोडली मालिका?
अभिनेता आमिर खानने एका चीनी चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. नेव्हर से नेव्हर असं या चित्रपटाचं नाव आहे. त्यासाठी त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा चित्रपट पाहा असं आवाहन त्याने या व्हिडीओमध्ये केलं आहे. तो म्हटला की, हा चित्रपट चित्रपटगृहात आहे. मात्र या प्रमोशनमुळे आमीर खानला ट्रोलींगचा सामना करावा लागला आहे.
अखिलेश यादवांना दुसरा झटका! विश्वासू शिलेदाराने ऐनवेळी सोडली साथ
ग्लोबल टाईम्सने आमीरचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो त्याचा मित्र आणि चीनचे मोठे दिग्दर्शक बाओकियांगचा चित्रपट नेव्हर से नेव्हरला पाठिंबा देताना दिसत आहे. हा चित्रपट 6 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये काय म्हणाला आमिर खान पाहा…
#Bollywood star Aamir Khan from #India has shared a video online to support his Chinese friend, director Wang Baoqiang's new film "Never Say Never," which debuted at Chinese mainland cinemas on July 6. Calling the film "encouraging," Aamir said that he hopes it can "break the… pic.twitter.com/R84s7VHnYT
— Global Times (@globaltimesnews) July 14, 2023
आमिर म्हणाला की, नेव्हर से नेव्हर हा चित्रपट चित्रपटगृहात आहे. नुकताच त्याचा ट्रेलर पाहिला. खुप सुंदर आहे. त्यावरून हा चित्रपट प्रेरणादायी आणि भावनिक वाटतो. मला असे चित्रपट आवडतात. चित्रपटाच्या टीला शुभेच्छा आणि हा चित्रपट प्रेक्षकांनी जास्तीत जास्त पाहावा अशी कामना करतो. तसेच पुढे त्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्याच्या मित्रला आय लव्ह यू असं म्हटलं आहे.
नेटकऱ्यांनी केलं आमिरला ट्रोल
तर चीनी चित्रपटाचं प्रमोशन करणं आमिर खानला चांगलंच महागात पडले आहे. कारण हा व्हिडीओ पाहून आमिरला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. काहींनी म्हटलं की, या व्हिडओवरून आमिरचं चीन आणि पाकिस्तानवरील प्रेम स्पष्ट दिसत आहे. तर काही जणांनी आमिर मोदी आणि देश विरोधी आहे. त्यामुळे मित्राच्या चित्रपटाचं प्रमोशन आमिरच्या मात्र डीमोशनला कारणीभूत ठरतयं.