Tina Datta: ‘या’ लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्रीची प्रकृती खालावली; अन् सोडली मालिका?

  • Written By: Published:
Tina Datta

Tina Datta: कायम शुटिंगमध्ये व्यस्त, वेळेवर जेवण नाही, आणि धावपळीचे जीवन अशा दिवसामुळे शुटिंगच्या सेटवर अनेक सेलिब्रिटीची प्रकृती खालवल्याचे दिसून येत असते. ज्यामुळे प्रसिद्ध सेलिब्रिटींना अनेकवेळा रुग्णालयात भरती करावं लागले आहे. (Entertainment Tv) आता देखील शुटिंगच्या दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tina Datta

Tina Datta Post

एवढंच नाही तर तिच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शूटिंगच्या दरम्यान सेटवर ज्या अभिनेत्रीची प्रकृती खालावली ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर ‘बिग बॉस १६’ (Big Boss 16) फेम अभिनेत्री टीना दत्ता ही आहे. सध्या सर्वत्र टीना दत्ताची जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीची मोठी अपडेट सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ✨Tinzi In TinzelTown✨🧚‍♀️ (@tinadatta)


टीना दत्ता सध्या ‘हम रहे या ना रहे’ सिरीयलच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीची सेटवर प्रकृती खालवल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृती अधिक बिघडल्यावर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. टीनाने तिच्या प्रकृतीची माहिती इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक

इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत टीना म्हणाली की, गेल्या काही दिवससाठी अत्यंत वाईट परिस्थिती होते. प्रकृती खालावल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे मी आता व्यव्यस्थित आहे, आणि म्हणून सगळ्यांचे आभार मानते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us