जनाधार असलेल्या नेत्यांची कॉंग्रेसला अॅलर्जी; थोपटेंच्या पक्षांतरावरून सत्यजित तांबेंनी सुनावले

SatyaJeet Tambe on Congress for Ex Congress leader Sangram Thopate defection : पुणे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा मोठा धक्का बसला आहे.संग्राम थोपटे यांनी दिला पक्षाला अखेल रामराम केला आहे. त्यांनी आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर आमदार आणि माजी कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी संग्राम थोपटेंच्या पक्षांतरावरून कॉंग्रेसला चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले आमदार सत्यजित तांबे?
हा काँग्रेसचा संक्रमण काळ सुरू आहे. त्यामुळे यामध्ये काँग्रेसमध्ये भ्रमनिरास झालेले कार्यकर्ते नेते वेगळ्या राजकीय भूमिकेत जाण्याच्या पावित्रा घेताना दिसताय. कार्यकर्त्यांना ताकद देणे किंवाविधानसभा निवडणुकी नंतर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक काम करायला हवं होतं. ते करण्यात आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातील लोकांमध्ये नैराश्य आलेले आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, नायगावला सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र होणार
तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या दोन आकडी जागा सुद्धा निवडून येणार नाही. अशी स्थिती असताना देखील कॉंग्रेसच्या 42 जागा निवडून आल्या मात्र तरी देखील पक्षाने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले नाही. तसेच महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांना महामंडळ दिले जाईल अशी अपेक्षा होती मात्र तसं केलं नाही. जनाधार असलेल्या नेत्यांकडे पक्षाने दुर्लक्ष केलं. यामुळे काँग्रेसची परिस्थिती आली आहे आणि दिसून दिवस ही गंभीर होईल असं वाटत आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं.
मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, अनेकांना गोळ्या घातल्या; दोघे गंभीर
आम्ही सांगून कंटाळलो आहोत. माझी हकालपट्टी केल्यानंतर मला पक्षात घ्या किती वेळा वारंवार मला सांगावं लागलं.तरी देखील आम्हाला पक्षात घेतलं नाही. पराभव झालेल्या नेत्यांकडे लक्ष दिले जात नाही ही काँग्रेस पक्षातील शोकांतिका आहे.काँग्रेस पक्षात जनाधार नसलेले नेते नेतृत्व करताय? ही परिस्थिती अशी मला शंका येते.असं म्हणत कॉंग्रेसमधील स्थिती आणि संग्राम थोपटेंच्या पक्षांतरावर नाराजी व्यक्त केली आहे.