राज्य सरकारचा मोठा निर्णय, नायगावला सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र होणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय, नायगावला सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र होणार

Maharashtra Cabinet Decision :  राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत राज्य मंत्रिमंडाळाने (Maharashtra Cabinet Decision) मोठा निर्णय घेत मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.

तसेच याबरोबर गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देखील मंत्रिमंडाळाने दिली आहे. तर दुसरीकडे या बैठकीत कामगार विभागासाठी देखील मंत्रिमंडाळाने निर्णय घेतला आहे. या निर्णायानुसार राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात येणार आहे.

तर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय देखील राज्य सराकारने घेतला आहे. या निर्णायानुसार आता नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांचे मानधन 35 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये होणार आहे.

तर 14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे. याचबरोबर मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तर गृहनिर्माण विभागासाठी निर्णय घेत पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे.

‘संसदपेक्षा कोणीही वर नाही’, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा पुन्हा न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube