‘संसदपेक्षा कोणीही वर नाही’, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा पुन्हा न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

‘संसदपेक्षा कोणीही वर नाही’, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा पुन्हा न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Jagdeep Dhankhar On Supreme Court : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर आता पुन्हा एकदा त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संसद सर्वोच्च आहे आणि संविधान कसे असेल हे ठरव्याचा अंतिम अधिकार खासदारांना आहे, त्यापेक्षा कोणीही वर असू शकत नाही असं उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी म्हटले आहे. ते आज दिल्ली विद्यापीठातील (Delhi University) एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनगड म्हणाले की, संसद देशातील सर्वात मोठी संस्था आहे आणि संविधान कसे असेल हे निवडून आलेले खासदार ठरवतील. कोणतीही संस्था संसदेपेक्षावर असू शकत नाही. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही निर्णायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकदा न्यायलयाने म्हटले की संविधानाची प्रस्तावना त्याचा भाग नाही (गोलकनाथ प्रकरण) तर दुसऱ्या वेळी म्हटले आहे की प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे. (केशवानंद भारती प्रकरण) असं त्यांनी दिल्ली विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

लोकशाहीमध्ये गप्प राहणे धोकादायक : धनखड

या कार्यक्रमात पुढे बोलताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, लोकशाहीमध्ये संवाद आणि खुली चर्चा खूप महत्वाची आहे. जर विचार करणारे लोक गप्प राहिले तर ते नुकसान करु शकते . संवैधानिक पदांवर असलेल्या लोकांनी नेहमीच संविधानानुसार बोलले पाहिजे.

UPSC Result 2025 : पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, पहिल्या अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

आपल्याला आपल्या संस्कृतीचा आणि भारतीयतेचा अभिमान असला पाहिजे. देशात अशांतता, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. गरज पडल्यास कठोर पावले उचलली पाहिजेत. असं यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube