UPSC Result 2025 : पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, पहिल्या अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

Upsc result 2025 Archit Dongre From Pune Secures 3rd Rank : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 चा अंतिम निकाल आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. निकाल पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांची नावे आहेत. पुण्याचा (Pune) अर्चित डोंगरे देशात तिसरा आलाय.
UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. ती यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी शक्ती दुबेने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर मुलींमध्ये हर्षिता गोयलने पहिला क्रमांक पटकावला आहे, तिला एकूण दुसरा क्रमांक मिळाला आहे. शक्ती दुबे एका परीक्षेत अव्वल आली आहे, तर हर्षिता गोयल दुसऱ्या आणि डोंगरे अर्चित पराग तिसऱ्या स्थानावर आहे.
Congratulations to all selected candidates in UPSC 2024💐💐💐#UPSC #UPSC2024 #upscresult pic.twitter.com/xactzhCgYd
— Anurag Tripathi (@AnuragTripaathi) April 22, 2025
देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या यूपीएससी सीएसईमध्ये दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. ही परीक्षा केंद्र सरकारच्या आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस, आयटीएस आणि इतर गट ‘अ’ आणि ‘ब’ सेवांमध्ये नियुक्तीचा मार्ग मोकळा करते.
UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, आता यशस्वी उमेदवारांना त्यांच्या पसंती, रँक आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या सेवा आणि केडर देण्यात येतील. हे वाटप भारत सरकारच्या धोरणांनुसार असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच उमेदवारांना त्यांच्या भूमिका वाटून दिल्या जातील. यूपीएससी सीएसई परीक्षेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या देशातील भावी आयएएसची यादी अधिकृत वेबसाईटवर जावून पाहा.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं विदारक वास्तव; वाचा, १ जानेवारी ते ३१ मार्चचे धक्कादायक आकडे
यावर्षी नियुक्तीसाठी एकूण 1009 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. निवड खालीलप्रमाणे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहे – एकूण 1009 पैकी 12 PwBD-1, 8 PwBD-2, 16 PwBD-3 आणि 9 PwBD-5 श्रेणीतील उमेदवार आहेत.