Prakash Ambedkar : UPSC परिक्षेतून आरक्षण हटवलं! आंबेडकरांनी तेलंगणा सरकारला फैलावर घेतलं…

Prakash Ambedkar : UPSC परिक्षेतून आरक्षण हटवलं! आंबेडकरांनी तेलंगणा सरकारला फैलावर घेतलं…

Prakash Ambedkar : तेलंगणा लोकसेवा प्राथमिक परिक्षेतून आरक्षण हटवण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतलायं. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तेलंगणा सरकारला चांगलंच फैलावर घेतलंय. तुम्हाला अजूनही वाटतं का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल?
असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलायं. यासंदर्भात पोस्ट आंबेडकरांनी शेअर केलीयं.

‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’, बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम

आंबेडकर पोस्टमध्ये म्हणाले, “तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना न्याय देईल? काँग्रेसला प्रश्न विचारण्याऐवजी, त्यांना प्रश्न विचारा जे निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतांचे विभाजन करणारा पक्ष म्हणत होते आणि काँग्रेसला मते मागत होते.

कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये; बावनकुळेंनी कोकाटेंच्या वक्तव्यावरून सुनावले

2023-2025 या कालावधीत काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला 25 हजार कोटींपेक्षा अधिक निधी वळवून इतरत्र वापरला आहे. हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा असं आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीच फरक नसून वंचित आघाडीचे सुरुवातीपासूनच सामाजिक न्याय, घटनेतील हक्क आरक्षण लढा दिलायं. या निर्णयांनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षाचा चेहऱ्यावरील मुखवटा गळून आहेत, असा टोला आंबेडकरांनी लगावलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube