फुले शाहू आंबेडकरी जनता मटण, दारू आणि पैशाने विकली; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Prakash Ambedkar on Reservation and constitution : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला. ते म्हणाले की, फुले शाहू आंबेडकरी जनता मटण, दारू आणि पैशाने विकली गेली आहे. बुधवारी नांदेड शहरातील सिडको येथे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.
यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, दोन्ही बाजूने संकट आहे. एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता काढण्याचा भाग सुरु आहे आणि दुसरं राज्य आणि केंद्रात सत्तेत बसलेले म्हणत आहेत आम्ही या देशाच संविधान बदलू. तुमचं राहील काय? आरक्षण विरोधात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजप आरएसएस हे विरोधी आहेत. त्यांची भूमिका नाकारायची असेल तर आमचे मत आता त्यांना नाही. हा निश्चय झाला पाहिजे.
बस्थानकात सीसीटीव्ही बसवा, ढाब्यांवर थांबणाऱ्या बससाठी नियमावली तयार करा; विखेंचे महामंडळाला आदेश
पण फुले शाहू आंबेडकरी जनता मटण दारू पैशाने विकली आहे. अशी परिस्थिती झाली आहे. फुले शाहू आंबेडकरांची मशाल मिन मिनता दिवा झाल्याच दिसत आहे. ज्या दिवशी ही मशाल पुन्हा पेटलेली दिसेल. तेव्हा संविधान बदलणारे तुमच्याकडे गिरगिड्याहून बोलतील. त्यामुळे ही ताकद पुन्हा उभ करू अस आवाहन आंबेडकर यांनी केलं.
याच वेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप (BJP) सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली. तसेच काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत, असंही आंबेडकर म्हणाले.