महापौरपदाची सोडत काढणाऱ्या मिसाळांच्या नातेवाईकांचे नाव पुण्यासाठी चर्चेत वाचा संभाव्य यादी…
Pune Mayor सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. त्यानंतर इच्छुक आणि संभाव्य महापौर पदाच्या उमेदवारांची नावं समोर आली आहेत.
Pune Municiple Corporatiion Mayor Reservation Lottery Possible names in front for Mayor relatives of Madhuri Misal : महापालिकांच्या निवडणुकांनंतर राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये अनेक महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेल्या महापालिकांपैकी एक असलेल्या पुणे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झालं आहे.
आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप
त्यामुळे आता पुण्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महापौर पदासाठी इच्छुक आणि संभाव्य महापौर पदाच्या उमेदवारांची नावं समोर आली आहेत. त्यामध्ये रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, स्मिता वस्ते, मंजुश्री खर्डेकर यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे.
ब्रेकिंग! ठाणे, जालना लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर; कल्याण-डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी राखीव…
त्यातही मानसी देशपांडे हे नाव जास्त चर्चेत आहे. कारण त्यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे. तसेच त्या मंत्रालयामध्ये आरक्षण सोडत ज्यांच्या हस्ते पार पडली. त्या माधुरी मिसाळांच्या त्या नातेवाईक आहेत. त्यानंतर मंजुषा नागपुरे यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत. त्यांची ही सहावी टर्म आहे.
