‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’, बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम

‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’,  बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम

Ajit Pawar On Goons Beat Baramati Hotel Owner : बारामतीत (Baramati) मेडिकल कॉलेजवळ असलेल्या एका हॉटेल मालकाला तीन गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना झाली होती. ही सर्व घटना हॉटेलजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन गुंडांना अटक करण्यात आली होती. बीडमध्ये मागील काळात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरू होते, ही घटना देखील तशीच असल्यामुळे बारामतीत आता कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय.

अजित पवार यांनी भरला सज्जड दम

यासंदर्भात X अकाउंटवर पोस्ट करत अजित पवार यांनी म्हटलंय की, बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये काही जणांकडून एका (Baramati Crime) युवकाला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा व्यवस्थेसमोर सगळे समान आहेत. कायद्याचं उल्लंघन कोणीही करू नये, ते कदापी सहन केला जाणार नाही.

बारामतीत शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजजवळ एका हॉटेलमध्ये तीन मुले बाईकवरून आली. त्यांचा काउंटवर असलेल्या मालकाशी बोलत असताना वाद झाला. त्या मुलांनी त्यानंतर हॉटेलच्या मालकांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. जवळपास पाच ते सहा मिनिटे या तिघांनी हॉटेलच्या मालकाल लाथा-बुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली होती. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर आता सुनेत्रा पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आलीय.

सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया

बारामतीतील एका हॉटेलात एका युवकाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याशी मी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. अशाप्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर पावले उचलावी अशा सक्त सूचना मी त्यांना दिल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.

बारामतीत कोणी अशा प्रकारे कायदा हातात घेत असेल तर ते सहन केले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube