कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये; बावनकुळेंनी कोकाटेंच्या वक्तव्यावरून सुनावले

कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये; बावनकुळेंनी कोकाटेंच्या वक्तव्यावरून सुनावले

Chandrashekhar Bawankule decries Manikrao Kokate on his statement about farmers statement : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी आज अवकाळी पाऊस झालेल्या विदर्भाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात नुकत्याच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत पाहणी केल्याची माहिती दिली. त्यावेळी माध्यमांनी त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल प्रश्न विचारला तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचारणा करण्यात आली.

काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे?

कोणत्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ येऊ नये. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांना नुकसान भरपाई देणं ही सरकारची जबाबदारी आहे. कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही. ते काय बोलले याची मी माहिती घेईल. ते काही वादग्रस्त बोलले असतील तर आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू.

बीडमध्ये थेट गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल चोरला तर सामान्यांचं काय! योगेश कदमांकडून तक्रार दाखल

तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही पार पाडू. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विदर्भ आणि नागपूरमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई साठी प्रयत्न केला जाईल. अशी माहिती यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

काय म्हणाले होतेमाणिकराव कोकाटे?

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित एका शेतकऱ्याने कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं. ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला. त्यावेळी त्यांनी पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी म्हटलंय. तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले.

देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, कार्यालय फलकाची शहरात रंगली चर्चा

कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?” असा सवाल करत सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube