ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; पत्नीसाठी खिलाडी कुमारची खास पोस्ट, म्हणाला…

ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; पत्नीसाठी खिलाडी कुमारची खास पोस्ट, म्हणाला…

Twinkle Khanna Graduate: अभिनेत्री आणि अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला आहे. चित्रपट सोडून अभिनेत्रीने लेखनात आपले करिअर केले. यासोबतच तिने आपला अपूर्ण अभ्यासही पूर्ण केला आहे. ट्विंकल खन्नाने वयाच्या 50 व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर पत्नी ट्विंकलसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ट्विंकल ग्रॅज्युएशन कॅप घातलेली दिसत आहे. या फोटोसोबत अभिनेत्याने पत्नीसाठी एक प्रेमळ पोस्ट लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)


खिलाडीची पत्नीसाठी खास पोस्ट: अक्षयने पोस्ट करत लिहिले आहे की, ‘दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असे सांगितले होते, तेव्हा मला आश्चर्य वाटले होते, पण ज्या दिवशी मी तुला एवढी मेहनत करताना पाहिले तेव्हा मला समजले की मी एका सुपरवुमनशी लग्न केले आहे. तू तुझं घर, करिअर आणि आपली मुले तसेच स्वतःचे विद्यार्थी जीवन सांभाळले. आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी मी तुला शुभेच्छा देतो, जेणेकरुन टीनाबद्दल मला कायम अभिमान वाटतो, हे सांगण्यासाठी मला पुरेसे शब्द सापडतील… अभिनंदन आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.

याशिवाय ट्विंकल खन्नानेही तिच्या या गोड दिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती पदवी घेताना दिसत आहे. या पोस्टसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- आणि हा माझा पदवीचा दिवस आहे…गोल्डस्मिथमध्ये माझा पहिला दिवस जणू काल किंवा अनेक वर्षांपूर्वीचा वाटतो…सुंदर थाट, सुंदर साडी आणि माझे कुटुंब माझ्या कल्पनेपेक्षा हा दिवस अधिक खास बनवत आहे. आपण नेहमी स्वतःला काहीतरी करण्याची प्रेरणा देत राहिले पाहिजे.

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेच्या ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज

ट्विंकल खन्ना आणि तिचा मुलगा आरवने दोन वर्षांपूर्वी लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला होता. त्याचवेळी, आता अभिनेत्रीची पदव्युत्तर पदवी पूर्ण झाली आहे. ट्विंकलला तिच्या ग्रॅज्युएशनबद्दल सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता छोटे मियाँ बडे मियाँ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीजसाठी सज्ज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज