Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेच्या ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेच्या ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज

Vishwamitra Title Song Teaser Released: ‘विश्वमित्र’ (Vishwamitra Song) या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (social media) अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Vishwamitra Title Song Teaser ) पहिल्या `विश्वमित्र’ या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे यांच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून दोघांची हळुवार सुरू होणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यांची ही प्रेमाची गोष्ट येत्या 19जानेवरीला आपल्या भेटीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते (Girija Gupte) यांनी केली आहे. `विश्वमित्र`हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायले असून या गाण्याला संगीत आणि बोलही त्यांचेच लाभले आहेत.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आमच्या अल्बममधील टायटल सॉंग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील राकड, रांगडे शब्द लोकांना भावणारे आणि आपलेसे करणारे आहे. गावाकडे सर्रास वापरले जाणारे हे बोलीभाषेतील शब्द गाण्यात एक गावरान तडका आणत आहेत. या गाण्यातून एक कथा उलगडत आहे.’’

… अन् अभिनेत्रींच्या प्रेमात पडले जावेद अख्तर, साधेपणावर भाळल्याने केले प्रपोज, क्यूट लव्ह स्टोरी

सांगायचं झालं तर, अवधूत याने नव्या गाण्यासाठी ही पोस्ट लिहीली आहे. ‘विश्वमित्र’ असं अवधूत याच्या नव्या गाण्याच्या अल्बमचं नाव आहे.. अवधूत कायम त्याच्या नव्या गाण्यांचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतो. अवधूत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अवधूत याने आतापर्यंत राजकीय पक्षांचे टायटल साँग देखील लिहीले आहेत. आता चाहत्यांमध्ये गायकाच्या नव्या गाण्यांची उत्सुकता लागली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज