Avadhoot Gupteने केली ‘लावण्यवती’ या नवीन कलाकृतीची घोषणा; चाहते म्हणाले, “दादाचा…”

Avadhoot Gupteने केली ‘लावण्यवती’ या नवीन कलाकृतीची घोषणा; चाहते म्हणाले, “दादाचा…”

Avadhoot Gupte: मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता अशी अवधूत गुप्तेची चांगलीच ओळख आहे. आपल्या अनोख्या आणि अप्रतिम गाण्यांमुळे त्याने संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Lavanyavati New Song) अवधूतने आत्तापर्यंत गाण्याच्या अनेक अल्बमची (albums) निर्मिती केली आहे. (Social media) आता पुन्हा एकदा अवधूत एक नवा अल्बम घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)


लावण्यवती असं अवधूतच्या नव्या अल्बमच नाव आहे. हा अल्बम लावणीच्या गाण्यांवर आधारित असल्याचे बघायला मिळत आहे. या अल्बममध्ये चार लावण्या आहेत. अवधूतने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या अल्बमच्या गाण्याची झलक बघायला मिळाली आहे. या अल्बमला संगीत अवधूत गुप्तेने दिलं असून निर्मिती देखील त्याने केली आहे.

अवधूतने पोस्ट करत सांगितले आहे की, “एकविरा म्युझिक तर्फे घेऊन येत आहोत ‘लावण्यवती‘ ! पुन्हा एकदा मैफल रंगणार अल्बमची..पुन्हा एकदा लडी सजणार गाण्यांची! एका पाठोपाठ एक अशी येणार चार गाणी.. हातात हात गुंफून सांगणार एकच कहाणी! ढोलकीच्या थापेवर, घुंगरांच्या बोलावर थिरकणार ‘लावण्यवती‘! मग शिट्ट्याही वाजणार.. फेटेही उडणार! परंतु, दरवेळेस प्रयत्न होणार काहीतरी नवीन शोधण्याचा.. काहीतरी नवीन करण्याचा! म्हणून आम्हीच म्हणतो.. की ही ‘लावणी‘ नव्हेच.. ही तर ‘कापणी‘!! पहिलं पुष्प.. लवकरच!!”

Kiran Mane: किरण मानेंकडून किंग खानचं तोंडभरुन कौतुक; म्हणाला, “अख्ख्या देशानं घरात…”

गेल्या काही दिवसांपासून अवधूतने राजकारणामध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मध्यंतरी अवधूत गुप्ते अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मंचावर झळकला होता. यामुळे तो लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे दिसत आहे. तसेच याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. अवधूतने सांगितले आहे की, मला कोणतीही निवडणूक आली की विचारणा होते. यामुळे मी राजकारणामध्ये एन्ट्री करणार आहे हे आता जाहीरच करुन टाकतो. जेव्हा काही मिळवायचं नाही किंवा काही गमवायचं नाही अशा वेळी मी राजकारणामध्ये येणार असल्याचे भाष्य अवधूतने केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube