Kiran Mane: किरण मानेंकडून किंग खानचं तोंडभरुन कौतुक; म्हणाला, “अख्ख्या देशानं घरात…”

Kiran Mane: किरण मानेंकडून किंग खानचं तोंडभरुन कौतुक; म्हणाला, “अख्ख्या देशानं घरात…”

Kiran Mane Post: अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (Social media) कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधत असतात. नुकतीच किरण माने यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता किंग खान म्हणजेच सर्वांचा लाडका शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कौतुक केल्याचे बघायला मिळाले आहे.


काय आहे नेमकं पोस्टमध्ये ?
“बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर !”
अग्ग्गाय्यायायाया… अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा !पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच भन्नाट,जबराट,नादखुळा. …तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस….ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास….तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर ‘बाजीगर’ ! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती ‘क़ातिल’ नजर रोखून.

आजबी तुझ्या ‘मन्नत’पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात… तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात… त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच ‘अस्सल’ भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात…येडी होत्यात. जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू.

तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर ‘मानूस’ म्हनूनबी तू ‘किंग’ हायेस ! ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हाॅस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वाॅर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवाॅर्ड मिळवलंयस. साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो !

Kishor Kadam: ‘बापाबद्दलच्या फिल्म्स… ‘; किशोर कदम यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

‘पठाण’च्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते. पठाण सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता तुझा ‘जवान’ मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा… होऊ दे जाळ न् धूर संगट… चिखलात धुरळा, पान्यात आग काढ… आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. ‘पठाण’सारखा परत परत बघनार. लब्यू भावा.

किरण माने यांनी या पोस्टमध्ये पठाण या सिनेमाचं देखील जोरदार कौतुक केलं आहे. किंग खानचा ‘जवान’हा बहुप्रतिक्षित सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात किंग खानसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. किंग खानच्या जवान सिनेमानंतर त्याचा डंकी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी किंग खानचा पठाण हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube