… अन् अभिनेत्रींच्या प्रेमात पडले जावेद अख्तर, साधेपणावर भाळल्याने केले प्रपोज, क्यूट लव्ह स्टोरी

… अन् अभिनेत्रींच्या प्रेमात पडले जावेद अख्तर, साधेपणावर भाळल्याने केले प्रपोज, क्यूट लव्ह स्टोरी

Javed Akhtar Birthday Special: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये लव्ह अफेअर, लग्न, घटस्फोट या गोष्टी कायम सुरुच असतात. पण बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांचा आदर्श अनेकांसमोर कायम समोर उभा आहे. (Javed Akhtar lovestory) या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेते जावेद अख्तर (Javed Akhtar ) आणि पहिली पत्नी हनी इराणी (Honey Irani). एकीकडे हनी इराणी या उत्कृष्ट अभिनेत्री तर दुसरीकडे जावेद अख्तर हे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार. आज जावेद अख्तर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी…

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांना कोण ओळखत नाही? जावेद अख्तर यांचा आज 79वा वाढदिवस आहे. ‘शोले’, ‘डॉन’, ‘सीता और गीता’, ‘त्रिशूल’ यांसारख्या बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांचे लेखक जावेद अख्तर यांचे खरे नाव ‘जादू’ आहे. जावेद साहब यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी ग्वाल्हेर येथे प्रसिद्ध कवी जानिसार अख्तर यांच्या घरी झाला आणि त्यांची आई सैफिया अख्तर गायिका-लेखिका होत्या. जावेद अख्तर यांनी लहान वयातच आपल्या आईला गमावले आहेत. जावेद अख्तर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक गाणी आणि चित्रपट लिहिले आहेत. जावेद केवळ त्याच्या प्रोफेशनल लाइफसाठीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.

पत्ते खेळताना पहिल्या पत्नीला प्रपोज केले: जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी होते. सलमान खानचे वडील सलीम खान गीतकाराच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन हनी इराणीच्या आईकडे गेले होते, मात्र हनीची आई या नात्यासाठी तयार नव्हती. त्यावेळी ते म्हणाले होते की, दोघांचे लग्न होऊ द्या. पुढे एक दिवस जावेद अख्तरने पत्ते खेळत असताना त्याची माजी पत्नी हनी इराणीला प्रपोज केले होते. पत्ते खेळताना जावेदने हनीला पत्ते चांगले निघाले तर मी तुझ्याशी लग्न करेन, असे सांगितले होते. जावेदने असे म्हटल्यानंतर पत्ते चांगले निघाले आणि यानंतर गीतकार जावेद अख्तरने हनी इराणीशी लग्न केले. लग्नाच्या वेळी जावेद अख्तर 27 वर्षांचे होते, तर हनी इराणी 17 वर्षांची होती. लग्नानंतर लवकरच हनीने मुलगी झोयाला जन्म दिला आणि 1974 मध्ये त्यांना फरहान हा मुलगा झाला.

Lagna Kallol: सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; एकदा पहाच!

जावेद अख्तर 1970 च्या दशकात कवी आणि लेखक कैफी आझमी यांच्या घरून संगीताचे धडे घेत असत. जावेद अख्तर यांना शबाना आझमी यांच्या कलाकृतीचे वेड होते. वारंवार भेटीनंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा कैफी आझमीला हे कळले तेव्हा तो सुरुवातीला त्यांच्या नात्याच्या विरोधात होता, कारण जावेद अख्तर आधीच विवाहित होते. मात्र, शबाना आझमीसोबत लग्नापूर्वी जावेद आणि इराणी यांचा घटस्फोट झाला होता. 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये शबाना आझमीशी लग्न केले. जावेद अख्तर यांना साहित्य अकादमी, पद्मश्री, पद्मभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्यांच्या गाण्यांसाठी आणि लेखांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज