Akshay Kumar: खिलाडीने केलं किंग खानचं तोंडभरून कौतुक, म्हणाला…

Akshay Kumar: खिलाडीने केलं किंग खानचं तोंडभरून कौतुक, म्हणाला…

Akshay Kumar: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच चाहत्यांचा शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. (Social media) किंग खानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सध्या खूपच चांगला चालत आहे, असं कौतुक चाहते करत आहे. ‘जवान’ने पहिल्या दिवशीच दमदार गल्ला कमावला आहे. जगभरात ‘जवान’ने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

https://x.com/akshaykumar/status/1701226654981308921?s=20

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ चांगलीच घोडदौड बघायला मिळत आहे. सिनेमातील संवाद, तसेच काही सीन्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. तसेच सिनेमासृष्टीतील बऱ्याच लोकांनी देखील किंग खानच्या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कंगना, करीना, हृतिक ते थेट एसएस राजामौली यांनी देखील या सिनेमाचं जोरदार कौतुक केलं आहे.

तसेच बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) देखील या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केले आहे. खिलाडीनेही नुकतंच ‘पिंकव्हीला’चं ट्वीट पुन्हा शेअर करत किंग खानचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये अक्षय म्हणतो की, “माझा जवान, पठाण, किंग खानचे त्याच्या सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मनापासून अभिनंदन. आपल्या सिनेमानी पुन्हा जबरदस्त कमबॅक केला आहे.” हे ट्वीट करत असताना खिलाडीने ‘जवान’च्या कलेक्शनचे आकडे देखील शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.

Dharmendra यांची प्रकृती खालावली; सनी देओल तातडीनं अमेरिकेला रवाना

‘जवान’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. याअगोदर हा रेकॉर्ड किंग खानच्या ‘पठाण’ आणि सनी पाजीच्या ‘गदर २’च्या नावे होता. या दोघांना मागे टाकत ‘जवान’ने चांगलीच बाजी मारली आहे. या सिनेमात किंग खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका बघायला मिळत आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube