बहिण म्हणून मागे हटा म्हणत शरद पवारांच्या नेत्याचं प्रीतम मुंडेंना आवाहन अन् धनंजय मुंडेंना ‘तो’ सल्ला

बहिण म्हणून मागे हटा म्हणत शरद पवारांच्या नेत्याचं प्रीतम मुंडेंना आवाहन अन् धनंजय मुंडेंना ‘तो’ सल्ला

Ravikant Rathod : शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod ) यांनी शरद पवारांनी जर आपल्याला संधी दिली. तर प्रीतम मुंडेंनी बहिण म्हणून बंजारा कुटुंबातील सर्वसामान्य तरुणाला म्हणजेच राठोड यांना पुढे येऊ द्याव असा आवाहन केलं. तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडेंना निवडणून आणण्याचं अश्वासन देणाऱ्या धनंजय मुंडेंनाही सल्ला दिला आहे.

सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचे राईट हँड; ‘ईडी’ने अटक केलेले सूरज चव्हाण नेमके कोण?

बीडमध्ये महायुतीचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यात अनेकांनी लोकसभेला केवळ भाजपच्या उमेदवार खासदार प्रीतम मुंडेच असतील, असे भाषणात सांगितले. लोकसभा निवडणुकीचा बहिणीचा सगळा भार माझ्या खांदावर घेतलाय, असा शब्दच भाऊ धनंजय यांनी बहिण प्रीतमताईला दिला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे रविकांत राठोड यांनी सांगितलं की, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बीड जिल्हा हा राष्ट्रवादीकडे असणार आहे. त्यामुळे बीड मतदार संघातून मी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये एकेकाळी एकमेकांमधून विस्तवही जात नसलेले लोक मांडीला मांडी लावून बसले आहेत.

वादग्रस्त वक्तव्ये अंगलट! अमोल मिटकरींची सहा महिन्यातच ‘मुख्य प्रवक्तेपदावरुन’ उलचबांगडी

त्यात त्यांनी प्रीतम मुंडेंना उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे आश्वासन दिले. पण गेल्या अनेक दशकांपासून मुंडे परिवाराच्या मागे वंजारीसह बंजारा समाज देखील आहे. अनेक वर्षांपासून आम्ही तुमच्या सोबत आहोत मात्र आता शरद पवारांनी जर मला संधी दिली तर तुम्ही बहिण म्हणून बंजारा कुटुंबातील सर्वसामान्य तरुणाला पुढे येऊ द्या व असा आवाहन शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड यांनी केले.

Katrina Kaif: फ्लॉपनंतर कतरिना’च्या ‘या’ चित्रपटाला IMDB वर मिळाले सर्वाधिक रेटिंग

तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या आतापर्यंतच्या कामावर टीका देखील केली. ते म्हणाले की राज्यात बीडची ओळख ही छोटा बिहार म्हणून होत आहे मात्र सध्याचे नेते ही ओळख पुसून चांगली ओळख जिल्ह्याला मिळवून देऊ शकत नाहीत. तसेच प्रीतम मुंडे यांना भावनिक वातावरणामुळे निवडून दिलं आहे त्यांनी म्हणावसं जिल्ह्याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे त्या जरी गोपीनाथ मुंडे यांच्या रक्ताने वारसदार असल्या तरी आम्ही मुंडेंचे विचारांचे वारसदार आहोत.

तसेच यावेळी राठोड यांनी धनंजय मुंडे नाही सल्ला दिला की धनंजय मुंडेंना जर खरंच मुंडे भगिनींचा पुळका असेल तर त्यांनी पंकजा मुंडेंना स्वतःची विधानसभा द्यावी आणि त्यांना बिनविरोध निवडून आणावं. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्याकडून बीडमध्ये मोठ्या मेळाव्याचा आयोजन करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube