सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? दमानिया यांचा मेसेज व्हायरल..

सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? दमानिया यांचा मेसेज व्हायरल..

प्रशांत गोडसे, मुंबई 

Mumbai News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) आणि ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात (Sushma Andhare) पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. त्याला कारण ठरलं आहे अंजली दमानियांचं व्हायरल झालेला एक मेसेज. सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यात ट्विटर वॉर पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

सुषमा अंधारे यांचं ट्विट

अंजली दमानिया तुम्हाला किती तो प्रसिद्धी झोतात राहण्याचा सोस, कधीतरी अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंगवरील मेसेजचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दमानियांना विचारला होता तसेच दमानिया यांना प्रसिद्धी झोतात राहण्याची खूप हौस आहे. त्यासाठी असे माहिती न घेता केवळ चर्चेत राहण्यासाठी त्या असे करतात असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया या माझ्या पीआर टीममध्ये काम करत आहे का? की त्यांनी ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय कारण समजून घेऊ या

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानियांचा एक ब्रॉडकास्टिंग ग्रुप आहे. ग्रुपच्या माध्यमातून त्या पत्रकारांच्या संपर्कात असतात त्यामध्ये त्यांनी सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? असा मेसेज पाठवला होता. सदर मेसेज वायरल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर अंजली दमानियांनी सुषमा अंधारेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? छान … असो. मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे. खरतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले. मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होता आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात.

हे खरे आहे की नाही ह्यावर खरं उत्तर द्याल का? बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही. प्रकाशझोतात ज्यांना यायचं असतं ते वाट्टेल ते करतात. त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात हे मला ह्या जन्मी जमणार नाही.

तुमच्या माहितीसाठी, काल एका चॅनलने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार ह्यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक media broadcast च्या व्हॉट्सअप ग्रुप वर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला..

2014 साली सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. नंतरच्या काळात सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मकडे बघितले जात आहे. सामान्य माणूस देखील आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला आहे. मग राजकीय नेते देखील मागे का राहतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार त्यासोबत मंत्री देखील सोशल मीडियचा सर्रास वापर करत आहे तर विरोधी पक्षाचा विचार केला तर ठाकरे शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे देखील दररोज ट्विटरच्या माध्यमातून सरकारला लक्ष करत असतात, संजय राऊत देखील ट्विटच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार?, खासदार संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सरकारला लक्ष करत असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जनतेचे समस्या मांडण्यासाठी होतो त्यासोबत एकमेकांना लक्ष करण्यासाठी राजकारणांकडून सर्रास केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरतांनी त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अंजली दमानिया यांच्या व्हायरल झालेल्या मेसेजचा विचार केला तर सुषमा अंधारे या अजित पवार गटात जाणार की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र आपण शिवसेनत असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube