ईडीच्या भीतीने विरोधकांच्या दारात लाचारासारखे बसले; पवारांची मुश्रीफांवर जहरी टीका

ईडीच्या भीतीने विरोधकांच्या दारात लाचारासारखे बसले; पवारांची मुश्रीफांवर जहरी टीका

Sharad Pawar On Hasan Musrif : ईडीच्या भीतीनेच विरोधकांच्या दारात लाचारासारखे जाऊन बसले असल्याची अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif) यांच्यावर केलीयं. दरम्यान, कागलमध्ये समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलायं. या प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार यांचा रोख हसन मुश्रीफांवर असल्याचा दिसून आला आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु, ‘या’ पद्धतीने करता येणार नाव नोंदणी

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कागल तालुक्यातून आम्ही एका व्यक्तीला प्रोत्साहित केलं होतं. त्याच व्यक्तीच्या हाती सत्ता दिली होती. सगळं काही दिलं पण प्रसंग येतो, संकटं येतात तेव्हा संकटांना सामोरं जायंचं ही आपली जबाबदारी असते. पण ईडीच्या चौकशीच्या भीतीने काही लोकं विरोधकांच्या दारात जाऊन बसले आहेत, हा कागलचा इतिहास नाही, या शब्दांत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता निशाणा साधलायं.

‘हा’ संविधानाचा अपमान, नाना पटोलेंचा जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल

तसेच अनेक लोकं आम्हाला सोडून गेले आहेत. याच तालुक्यातून काही लोकं सोडून गेले आहेत. संकटाच्यावेळी साथ द्यायची सोडून ते दुसऱ्यांसोबत गेले आहेत. ठीक आहे, पण त्यांना त्यांच्या जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी मुश्रीफांना दिलायं. तसेच कागल काहीही सहन करीन पण लाचारी सहन करणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी जनतेला केलंय.

ठरलंच! समरजितसिंह घाटगे यांचा आज ‘राष्ट्रवादी’त प्रवेश; भाजपला कोल्हापुरी धक्का..

घाटगेंना फक्त आमदारच नाही तर…
समरजित घाटगे यांच्या भूमिकेचं मी स्वागतच करीत आहे, अनेक दिवसांपासून सुरु होतं, अखेर घाटगे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलायं. आता तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदारच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच शरद पवार यांनी कागलकरांना दिलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube