Delhi Liquor Scam : षडयंत्राचा सूत्रधार अरविंद केजरीवाल; ईडीच्या चार्जशीटमध्ये कोण-कोणते आरोप?

Delhi Liquor Scam : षडयंत्राचा सूत्रधार अरविंद केजरीवाल; ईडीच्या चार्जशीटमध्ये कोण-कोणते आरोप?

Delhi Liquor Scam : राजधानी दिल्लीत सध्या मद्य घोटाळा प्रकरण (Delhi Liquor Scam) चांगलच चर्चेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरोधात ईडीकडून एवेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलंय. यासोबतच इतरही अनेक गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आले आहेत. चार्जशीटमध्ये केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीलाही (Aam Aadmi Party) आरोप करण्यात आलायं. तर केजरीवालांवर किंगपिन, कट रचण्याचाही आरोप ठेवण्यात आलायं. यासोबतच चार्जशीटमध्ये गोव्याच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर करण्याबाबतची माहिती देण्यात आलीयं.

‘सच कह रहा है दिवाना’ ते ‘सारी दुनिया जला देंगे’ बी प्राकच्या जुन्या क्लासिक गाण्याची एक झलक

आरोपी विनोद चव्हाण आणि अरविंद केजरीवाल यांच्या व्हॉट्सअप चॅटींगची माहिती चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली असून गोव्यात निवडणुकीच्या काळात कविता यांचे सहाय्यक विनोद यांच्यामार्फत 25.5 कोटी रुपये आम आदमी पक्षाला पोहोचवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. यावरुन विनोद चव्हाण आणि केजरीवालांचा संबंध असल्याचं स्पष्ट होत असल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलंय.

Video: जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मोहरी तलाव ओव्हर फ्लो, कुठ किती झाली नोंद?

ईडीने चार्जशीट दाखल केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात यावर सुनावणी झाली. सुनावणीमध्ये केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत समन्स पाठवण्यात आले आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून केजरीवालांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असून 12 जुलैला त्यांना न्याायालयात हजर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) याचिकेवर 15 जुलै रोजी सुनावणीचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाच्या 20 जूनच्या आदेशाला स्थगिती दिली होती, त्यानुसार केजरीवाल यांना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. तपास यंत्रणेला केजरीवाल यांच्या याचिकेवरील उत्तराची प्रत मंगळवारी रात्री ११ वाजता मिळाली आणि ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचं याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांना ईडीच्या वकिलांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube