गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही?, नाना पटोलेंचा सरकारला थेट सवाल

गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही?, नाना पटोलेंचा सरकारला थेट सवाल

Nana Patole PC : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात ड्रग्जचं रॅकेट (Drug racket) थांबता थांबत नाही. शनिवारी एफसी रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) सरकारवर टीकास्त्र डागलं.

के. पी. पाटील महाविकास आघाडीत जात असल्यानेच कारवाई; हसन मुश्रीफांचे आपल्याच मंत्र्यांकडे बोट ! 

नाना पटोलेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. ते म्हणाले, मी सरकारला पणोती नाही म्हणणार. पण या सरकारमध्येच हे का घडत आहे? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. राज्य करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार सक्षम राहीलं नाही. पुण्यात ड्रग्ज निर्माण होत नाही तर ते गुजरातमध्ये होतेय. गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही? असा सवाल पटोलेंनी केला.

विद्यार्थ्यांनी गुणवंत होण्यासोबत चारित्र्यसंपन्नही व्हावे; कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे गिरीराज सावंत यांचे प्रतिपादन 

पुढं बोतांना ते म्हणाले, परवा काळाराम मंदिरात हिंदू संघटनेने पॅाप्मलेट लावले की, इथे ढोर मांग-महार दिसले तर आम्ही झाडू बांधू. राज्यात जातीयवाद निर्माण केला जात आहे. आयपीएस-आयएएस यांच्या बदल्यांसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत, असा आरोपही पटोलेंनी केला.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा सध्या जोरात प्रचार सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांकडून या निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक, कर्चचारी, मुख्याध्यापकांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर बोलतांना पटोले म्हणाले की, पैसेच नाहीत तर कोकणात सोनं दिले जात आहे. साने गुरुजींचा महाराष्ट्रातील प्राध्यापकांना प्रलोभन दिली जात आहेत. माझे सगळ्यांना सांगणे आहे की, या लोकांनी तुमचे कधी प्रश्न मांडले नाहीत. आता ते तुम्हाला सोन घेऊन विकत आहे. त्यामुळं मतदात्यांनी हे सर्व लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे, असं पटोले म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube