विद्यार्थ्यांनी गुणवंत होण्यासोबत चारित्र्यसंपन्नही व्हावे; कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे गिरीराज सावंत यांचे प्रतिपादन

  • Written By: Published:
विद्यार्थ्यांनी गुणवंत होण्यासोबत चारित्र्यसंपन्नही व्हावे; कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे गिरीराज सावंत यांचे प्रतिपादन

पुणे: गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे भूषण आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी गुणवंत होण्यासोबतच चारित्र्यसंपन्नही व्हावे, असे प्रतिपादन कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांनी केले. कात्रज येथील वंडरसिटी सोसायटी येथे दहावी व बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठाण’च्यावतीने गौरव व सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी गिरीराज सावंत हे बोलत होते.( honor the students who achieved spectacular success in the 10th and 12th examinations on behalf of the ‘Karyasiddhi Pratishthan’. Giriraj Sawant spoke on the occasion)

या गुणगौरव व सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक शरद जीने, कुंजीर सर, कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक गिरीराज सावंत, वंडरसिटी सोसायटीचे चेअरमन संजय वाघ, संतोष शिळीमकर, जनार्धन भाटे, दिलीप जगताप, कांतीलाल लिपारे, गणेश वनशीव, राजाराम वीर, डॉ. शिंदे हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

शर्वरी वाघ ठरली Munjya चा सर्वात मोठा सरप्राईज फॅक्टर; म्हणाली मला खूप…

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन पालकांसह सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थी, विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून, पुढील करिअरसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. दिलीप जगताप यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.


Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीने आसाम फिल्म फेडरेशन रंगोली महोत्सवात इंडियाटूर विषयी थेटच सांगितलं


उघड्यावर भाजीपाला विकणार्‍यांच्या डोक्यावर ‘कार्यसिद्धी’चे मायेचे छत्र!

या विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळ्यादरम्यान उन्हातान्हात रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करण्यार्‍या विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचेही वितरण करण्यात आले. कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम राबविण्यात आला. ऐन पावसाळ्यात अशाप्रकारच्या छत्र्या मिळाल्याने या गोरगरीब विक्रेत्यांनी कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांचे आभार व्यक्त केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube